Amol Mitkari criticizes Kirit Somaiya : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा आमदार हसन मुश्रीफ यांचे कागल येथील निवासस्थान तसेच पुण्यातील मालमत्तांवर बुधवारी (११ जानेवारी) सक्तवसुली संचालनालयाने छापेमारी केली. या छापेमारीदरम्यान ईडीच्या अधिकाऱ्यांनी मुश्रीफ यांच्या कुटुंबीयांचीही चौकशी केली. ही छापेमारी तब्बल १२ तास चालली. भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी केलेल्या आरोपानंतरच ही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, मुश्रीफ यांच्यावर करण्यात आलेल्या या कारवाईवर राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. किरीट सोमय्या यांची तोतरी जबान आहे. त्यांची जीभ भाजपाविरोधात बोलण्यासाठी फडफड करत नाही. राज्यातील ईडीचे हे सरकार लवकरात लवकर जावे आणि बळीचे राज्य यावे, असे अमोल मिटकरी म्हणाले. ते आज (१२ जानेवारी) बुलढाण्यात ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> ‘धर्मवीर’ वादावर बोलताना नितेश राणेंची जीभ घसरली! अमोल कोल्हेंचा एकेरी उल्लेख करत म्हणाले “दाढी काढल्यावर त्याला…”

…त्यानंतर सोमय्या यांचे तोडं बंद झाले

“ईडी आणि सीबीआय या शासकीय यंत्रणा केंद्र सराकरच्या गुलाम आहेत. राष्ट्रवादीचे नेत अनिल देशमुख यांच्यावर आरोप करण्यात आले होते. मात्र त्यात अद्याप काहीही तथ्य समोर आलेले नाही. अशाच प्रकारे राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. किरीट सोमय्या यांनी अनेक नेत्यांवर आरोप केले. यामध्ये भावना गवळी, प्रताप सरकनाईक, यामिनी जाधव, यशवंत जाधव यांच्यावरही असेच आरोप करण्यात आले होते. मात्र हे नेते अन्य पक्षात गेले त्यानंतर सोमय्या यांचे तोडं बंद झाले,” अशी बोचरी टीका अमोल मिटकरी यांनी केली.

हेही वाचा >>> किरीट सोमय्या यांची भविष्यवाणी अन् ‘ईडी’ची कारवाई

भाजपासारखी विखारी प्रवृत्ती मातीत गाडल्याशिवाय राहणार नाही

“किरीट सोमय्या यांची जबान तोतरी आहे. त्यांची जबान भाजपाविरोधात फडकड करत नाही. ती जबान फक्त राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडीवरच गरळ ओकते. मात्र यावेळी सोमय्या यांचा नेम चुकला आहे. त्यांनी हिंदू आणि मुस्लीम असे ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी कोल्हापूरच्या शाहू मातीशी पंगा घेतला आहे. त्यामुळे कोल्हापूर आणि कागलची माती भाजपासारखी विखारी प्रवृत्ती मातीत गाडल्याशिवाय राहणार नाही,” असा विश्वास मिटकरी यांनी व्यक्त केला. तसेच, ईडापीडा टळो. महाराष्ट्रातील दळभद्री सरकार जावो. या जागेवर बळीराजाचे राज्य येवो, अशी इच्छाही अमोल मिटकरी यांनी व्यक्त केली.

हेही वाचा >>> “भारतातील ‘ही’ दोन खोकल्याची औषधं लहान मुलांना देऊ नका”, १९ मृत्यूनंतर जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा

मुश्रीफ यांच्या निवासस्थानाहून अनेक कागदपत्रे जप्त

दरम्यान, ईडीची पथकं बुधवारी सकाळीच मुश्रीफ यांच्या निवासस्थानी पोहोचली होती. ईडीने पुण्यातील कोरेगाव पार्क आणि बंडगार्ड येथील मालमत्तांवरही छापेमारी केली. यावेळी ईडीने मुश्रीफ यांच्या निवासस्थानाहून अनेक कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. ही कारवाई बुधवारी दिवसभर सुरू होती. कारवाईबाबात ईडीच्या अधिकाऱ्यांनी कोणतेही भाष्य करण्यास नकार दिला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amol mitkari criticizes kirit somaiya after ed raid on hasan mushrif house prd