अनिल देशमुख (Anil Deshmukh) हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार असून ते महाविकास आघाडी (MVA) सरकारमध्ये गृहमंत्री होते. त्यांनी काँग्रेस पक्षातून राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली. पण १९९५ च्या विधानसभा निवडणुकीत पक्षानं उमेदवारी नाकारल्याने त्यांनी काटोल मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवली आणि विजयी झाले. अपक्ष आमदार म्हणून पहिल्यांदाच विधानसभेत दाखल झालेले देशमुख युती सरकारमध्ये सामील झाले. त्यांच्याकडे शालेय शिक्षण, उच्च व तंत्र शिक्षण, सांस्कृतिक कार्य अशी विविध खात्यांची मंत्रिपदं देण्यात आली.
१९९९ साली शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केल्यानंतर देशमुखांनी राष्ट्रवादीत पक्षप्रवेश केला. त्यानंतर १९९९ आणि २००४ साली काटोल मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले. २०१४ च्या निवडणुकीत भाजपाचे (BJP) तत्कालीन उमेदवार आशिष देशमुख यांच्याकडून अनिल देशमुखांचा काटोलमधून पराभव झाला. मात्र, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत अनिल देशमुखांनी पुन्हा काटोलमधून निवडणूक जिंकली. महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांच्याकडे गृहमंत्रीपद देण्यात आलं होतं.Read More
२५० गावांत फिरणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसंवाद यात्रेला आज माजी मंत्री अनिल देशमुख यांनी हिरवी झेंडी दिली. हिंगणघाट विधानसभा मतदारसंघातील गावांमध्ये…