माजी आमदार अवधुत तटकरे हे भाजपच्या वाटेवर आहेत. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत आज मुंबईत त्यांचा पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे. अवधुत तटकरे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस खासदार सुनील तटकरे यांचे पुतणे आहेत. माजी आमदार अनिल तटकरे यांचे जेष्ठ चिंरजीव आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : चीनला ‘जशास तसे’ उत्तर का नाही ?

हेही वाचा : विश्लेषण : ‘आदिपुरुष’वर खरंच बंदी घातली जाऊ शकते का? सेन्सॉर बोर्डचे नियम जाणून घ्या

यापुर्वी त्यांनी रोहा शहाराचे नगराध्यक्षपद भुषवले आहे. तर विधान सभेत श्रीवर्धन मतदारसंघाचे आमदार म्हणून प्रतिनिधीत्व केले आहे. गृहकलहामुळे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेत प्रवेश केला होता. पण पक्षसंघटनेत त्यांना फारसे स्थान देण्यात आले नव्हते. आता शिवसेनेतील फूट आणि त्यामुळे पक्षाची झालेली वाताहत लक्षात घेऊन त्यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान अवधुत तटकरे यांनी यांनी आपल्या पक्षप्रवेशाला दुजोरा दिला आहे. लवकरच याबाबत आपली भुमिका जाहीर करू असेही स्पष्ट केले आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Avdhoot tatkare join bjp chandrasekhar bawankule alibaug raigad tmb 01