Balasaheb Thackeray: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ( Balasaheb Thackeray ) यांचे सुपुत्र आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना त्यांच्या वाढदिवसाच्या आदल्या दिवशीच एक खास गिफ्ट मिळालं आहे. २७ जुलैला उद्धव ठाकरेंचा वाढदिवस हा दिवस उजाडण्याआधी उद्धव ठाकरेंना बाळासाहेब ठाकरेंचं पोर्ट्रेट गिफ्ट मिळालं आहे. या पोर्ट्रेटची खासियत म्हणजे हे पोर्ट्रेट २७ हजार हिऱ्यांनी सजवण्यात आलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शैलेश आचरेकर यांनी साकारलं पोर्ट्रेट

हिंदूहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे ( Balasaheb Thackeray ) यांचं २७ हजार हिऱ्यांनी साकारलेलं एक खास पोर्ट्रेट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मातोश्री निवासस्थानी महाराष्ट्रातील तमाम निष्ठावान शिवसैनिकांकडून सप्रेम भेट म्हणून देण्यात आले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवक्ते आणि जनसंपर्कप्रमुख अॅड. हर्षल प्रधान यांच्या संकल्पनेतून साकारलेले आणि ख्यातनाम कलाकार शैलेश आचरेकर यांची कलापूर्तीने सजलेले हे हिऱ्यांनी नटलेले बाळासाहेब ठाकरे यांचे पोर्ट्रेट अतिशय आकर्षक झाले आहे. शैलेश आचरेकर यांनी यापूर्वी आपल्या कलेमुळे अनेक पुरस्कार मिळवले आहेत. ख्यातनाम कलावंत म्हणून ते सर्वांनाच माहीत आहेत.

हे पण वाचा- Uddhav Thackeray : “उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंची पाद्यपूजा करायला हवी होती”, ‘त्या’ कृतीवरून मनसेचा टोला

उद्धव ठाकरे काय म्हणाले?

“शैलेशने आचरेकर याने हिऱ्यांनी साकारलेलं बाळासाहेबांचं ( Balasaheb Thackeray ) हे पोर्ट्रेट खरोखर मनमोहक आहे आणि बाळासाहेब ठाकरे ( Balasaheb Thackeray ) राष्ट्रीय स्मारकात नक्कीच ते एक प्रमुख आकर्षण ठरेल” अशी प्रतिक्रिया हे पोर्ट्रेट स्नेहपूर्वक स्वीकारताना उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.

सहा महिन्यांच्या कालावधीत तयार करण्यात आलं पोर्ट्रेट

२७ हजार हिऱ्यांनी साकारलेलं हे पोर्ट्रेट बनवायला सहा महिन्यांचा कालावधी लागला. शैलेश आचरेकर यांनी अतिशय बारकाईनं यावर काम केले आहे. यापूर्वी त्यांनी असेच रतन टाटा यांचे पोर्ट्रेट तयार केलं होतं . उद्धव ठाकरेंना पोर्ट्रेट दिलं आणि त्यांनी पाहता क्षणीच पहिली प्रतिक्रिया “अरे वा सुंदर” अशी प्रतिक्रिया दिली, याचा आनंद झाल्याचं शैलेश आचरेकर यांनी सांगितलं.

२७ हजार हिऱ्यांनी सजलं आहे बाळासाहेब ठाकरेंचं पोर्ट्रेट, उद्धव ठाकरेंना निष्ठावान शिवसैनिकांनी दिली वाढदिवसाची भेट (फोटो-हर्षल प्रधान, शिवसेना, उबाठा)

उद्धव ठाकरेंना जेव्हा हे खास पोर्ट्रेट देण्यात आलं तेव्हा शिवसेना नेते संजय राऊत , विनायक राऊत,. शिवसेना उपनेते नितीन नांदगावकर , हिंगोली – नांदेड संपर्काप्रमुख बबन थोरात बाळासाहेब आणि आता उद्धवसाहेबांचे स्वीय सहाय्यक रवी म्हात्रे, आर्टिस्ट शैलेश आचरेकर आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष प्रवक्ते आणि जनसंपर्कप्रमुख अॅड. हर्षल प्रधान आदी. उपस्थित होते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Balasaheb thackeray portrait made with 27 thousand diamonds gift to uddhav thackeray by shivsainiks scj