देशाचे नेतृत्व करण्यासाठी धोरणाचा खमकेपणा मोदी यांच्याकडे आहे, त्यांच्या नेतृत्वाखाली २०२४ झाली होणाऱ्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजप तब्बल ४०० जागा मिळवेल असा ठाम विश्वास केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केला. साताऱ्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित भीम फेस्टिवलच्या उद्घाटनानिमित्त ते आलेले असताना पत्रकारांशी संवाद साधला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यपद्धती आणि एकूणच राज्य कारभाराविषयी सर्वसामान्यच काय तर जागतिक पातळीवर मोठ्या प्रमाणावर आकर्षण आहे. त्यांचे नेतृत्व आणि कामाची पद्धत यामुळे केंद्र स्तरावर सर्वसामान्य नागरिकांच्या विकास योजना राबविल्या जात आहेत. देशाची आर्थिक स्थिती आणि जीडीपी याच्या मध्ये वाढ होत आहे. त्यांच्या कामाची पद्धतीने भाजप सर्वसामान्य जनतेच्या जवळ जात आहे. एक काळ असा होता की देशाच्या लोकांना काँग्रेस पक्षाचे विलक्षण आकर्षण होते. मात्र आजच्या गांधी घराण्यामुळे ते राहिलेले नाही. महाराष्ट्रातील महाविकासआघाडी मध्ये समाविष्ट असणाऱ्या शिवसेना पक्षावरही लोकांचा विश्वास राहिलेला नाही.
कोल्हापूर विधानसभा निवडणूक आम्ही शंभर टक्के जिंकू. २०२४ च्या निवडणुका आणि कोणत्याही पोटनिवडणुका यामध्ये भाजपा हा मोठा पक्ष असल्याने आणि संघटनात्मक बांधणी मजबूत असल्याने ४०० हून अधिक जागा मिळू शकतील असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. देशात एक लाख ४३४ कोटीचे बजेट केवळ केंद्र स्तरावरील रस्त्यांसाठी आखण्यात आले आहे. मोदी शासनाने साठ टक्के निधी देशासाठी आणि ४० टक्के निधी राज्यांसाठी असा वाटप केला आहे. ४५ कोटी जनधन खाती उघडण्यात आली असून ३२ कोटी लोकांना मुद्रा लोन मिळाले आहे. त्यामुळे विकासकामांचा सुधा झपाटा जोरदार असून आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपला काळजी करण्याचे कारण नाही .
मनसेला सोबत घेणे योग्य वाटत नाही. मनसेचे सध्या वादळ असले तरी त्यांना फारशी मते मिळतात असे नाही .आता हिंदुत्ववादाचा मुद्दा घेतला असला तरी फारसा फरक पडत नाही. त्यामुळे त्यांचा वादळ हे भाषणांचा आहे, मतांचं नाही असा टोला त्यांनी राज ठाकरे यांना लगावला. निवडणुकीनंतर इंधन दरवाढ निश्चित कमी होईल. मात्र राज्याने काही टक्के दरवाढ कमी करावी, केंद्राला दोषी धरू नये. पवार साहेबां सारखा सक्षम नेता म्हणून त्यांची महाराष्ट्रात प्रतिमा आहे. तरीसुद्धा त्यांच्या घरावर हल्ले होत असेल तर त्याला मुख्यमंत्री जबाबदार असल्याचा टोला त्यांनी लगावला. या हल्ल्याबाबत भाजपकडे सातत्याने बोट दाखवले जाते. पण मात्र तसे नाही या प्रकरणाची चौकशी करावी ज्यामध्ये जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. एसटी कर्मचारी आणि त्यांचे पगार तसेच महामंडळाचे विलीनीकरण हे मुद्दे राज्य शासनाने तात्काळ निकाली काढून कर्मचाऱ्यांची सोय करावी असे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मांडले .
