आळंदी: ज्या देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदींना बंदी घातली होती. त्या देशाचे राष्ट्राध्यक्ष नरेंद्र मोदी यांचे स्वागत करण्यासाठी येतात. ही अभिमानाची गोष्ट आहे. देशातील नागरिकांचा हा बहुमान आहे. चीनमध्ये देखील नरेंद्र मोदी गेले होते. तेव्हा तेथील व्यक्तींनी मोदींना पाहण्यासाठी सुट्टी घेतली होती. मोदींची ही लोकप्रियता जगाच्या पाठीवर बघायला मिळते आहे. मोदींना बॉस म्हणतात…असे विधान केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे यांनी केले आहे. ते आळंदीत मोदी @९ महाजनसंपर्क अभियानाच्या जाहीर सभेत बोलत होते. यावेळी भाजप आमदार महेश लांडगे, मावळ तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडें यांच्यासह इतर पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रावसाहेब दानवे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अमेरिकीने स्वागत केले. एकेकाळी त्याच अमिरेकीने मोदींना बंदी घातली होती. १४० कोटी लोकसंख्येचा देशाने उपमुख्यमंत्री असलेल्या नरेंद्र मोदींना पंतप्रधान केले. तेव्हा सर्वात अगोदर अमेरिकेचे निमंत्रण आले होते. २० हजार रुपयांचे तिकीट काढून त्यांची सभा ऐकण्यासाठी लोक गेले. त्याच मोदींचे स्वागत करण्यासाठी आज अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष येतात ही अभिमानाची गोष्ट आहे. हा सर्वसामान्यांचा बहुमान आहे. पुढे ते म्हणाले, नरेंद्र मोदी चीनमध्ये गेले. त्यांना पाहण्यासाठी तिथल्या नागरिकांनी सुट्ट्या काढल्या. ही लोकप्रियता जगाच्या पाठीवर मोदींची पाहायला मिळते आहे. मोदी यांना बॉस म्हणतात. मनमोहन सिंग परदेशात गेले आणि आले तर कधी त्यांची पेपरला बातमी येत नव्हती. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिका दौऱ्यावर आहेत त्यांची दाखल प्रत्येक चॅनल घेतली असे देखील त्यांनी म्हटलं.

आणखी वाचा-पंकजा मुंडे बीआरएस पक्षात जाणार? अंबादास दानवे म्हणाले, “आज ना उद्या त्या…”

पुढे ते म्हणाले की, विरोधकांच्या मनात धडकी आहे. की, २०२४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुन्हा पंतप्रधान होतील. त्यांच्या मनात भीती आहे. त्यामुळे विरोधकांनी मोट बांधण्यास सुरुवात केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात विरोधक एकवटले आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Citizens took holidays to see narendra modi in china says raosaheb danve kjp 91 mrj