Eknath Shinde Speech in Khed Rally: दोन आठवड्यांपूर्वी ५ मार्च रोजी उद्धव ठाकरेंनी खेडमधील सभेमधून शिंदे गटावर आणि भाजपावर परखड शब्दांत हल्लाबोल केला होता. त्यानंतर आता पुन्हा खेडमधल्या त्याच गोळीबार मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जाहीर सभा घेतली असून या सभेच्या अनुषंगाने दोन्ही गटांमध्ये आरोप-प्रत्यारोप झाल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे आज एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंना कशा प्रकारे प्रत्युत्तर देणार याबद्दल कमालीची उत्सुकता राजकीय वर्तुळात पाहायला मिळाली.
दरम्यान, यावेळी बोलताना एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला.
CM Eknath Shinde Speech in Khed: उद्धव ठाकरेंची सभा झालेल्या मैदानावरच एकनाथ शिंदेंची जाहीर सभा!
५ मार्चला उद्धव ठाकरेंच्या सभेमुळे चित्र स्पष्ट झालंय. आता इतरांच्या सभेवर आम्ही का बोलावं? पण जनता कुणाबरोबर आहे, हे निवडणुकीत स्पष्ट होईल – संजय राऊत
ते घोषणा तर करतीलच, पण शिंदे-फडणवीस सरकार काम करणाऱ्यांचं सरकार आहे. हे कोकण आणि महाराष्ट्रातील प्रत्येक भागासाठी काम करणारं सरकार आहे – दीपक केसरकर
बाळासाहेबांची शिवसेना उद्धव ठाकरेंनी संपवली. गद्दारच जर म्हणायचं असेल, तर उद्धव ठाकरे गद्दार आहेत. आज कोण आहेत त्यांच्यासोबत? ज्यांनी आयुष्यात त्यांना घेरलं, वेगवेगळे लाभ घेतले, त्यांना आता उद्धव ठाकरेंची तळी उचलून धरावी लागतेय – गजानन कीर्तीकर, ठाकरे गटाचे नेते
त्यांच्याकडे तोंड दाखवायला जागा नाही आणि काय करारा जवाब देणार? यांच्यात तर गद्दारी घुसली आहे. गद्दार माणूस काय करारा जवाब देणार? – अंबादास दानवे, विधानपरिषद विरोधी पक्षनेते
एकनाथ शिंदेंच्या सभेचा टीझर…
एकनाथ शिंदेंच्या सभेबद्दल रामदास कदम म्हणतात, “कोकणात आजपर्यंत जितक्या सभा झाल्या, त्या सगळ्यांचा रेकॉर्ड ब्रेक…!”
(फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
CM Eknath Shinde Speech in Khed: उद्धव ठाकरेंची सभा झालेल्या मैदानावरच एकनाथ शिंदेंची जाहीर सभा!