शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे समर्थक असे उघड दोन गट पडले आहेत. ४० आमदारांच्या बंडखोरीनंतर या दोन्ही गटांमधील राजकीय संघर्ष दिवसेंदिवस वाढतच जात आहे. असे असले तरी काही आमदार अजूनही ठाकरे कुटुंबीय तसेच मातोश्रीविषयी आदर राखून आहेत. त्याची प्रचिती काही दिवसांपूर्वी दीपक केसरकर यांच्या माध्यमातून आली होती. त्यांनी भाजपा नेते नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे, मातोश्रीवर बोलणे टाळावे, अशे आावाहन केले होते. दरम्यान, केसरकर यांनी पुन्हा एकदा नारायण राणे यांने यांचे नाव घेत अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्युप्रकरणात पत्रकार परिषदा घेऊन शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांची बदनामी करण्याचा करण्यात आला, असे विधान केले आहे. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> Sharad Pawar : शरद पवार संजय राऊतांच्या कुटुंबीयांची भेट घेण्याची शक्यता

“जेव्हा अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरण घडले तेव्हा आदित्य ठाकरे यांची बदनामी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. विद्यमान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी त्यावेळी पत्रकार परिषदा घेतल्या. आदित्य ठाकरेंची बदनामी करण्यामागे या पत्रकार परिषदांचा मोठा वाटा होता. ठाकरे कुटुंबीयांवर जे प्रेम करतात ते यामुळे दुखावले होते. मीदेखील माझी नाराजी भाजपा नेत्यांना सांगितली होती. अशा गोष्टींसाठी तुम्ही तुमचा मंच कसा वापरू देता असे त्यांना विचारले होते. तेव्हा आमच्या बहुतांश आमदारांचा अशा तऱ्हेच्या बदनामीला विरोध आहे, असे त्यांनी सांगितले होते,” असे दीपक केसरकर यांनी सांगितले.

हेही वाचा >>> राज्यपाल कोश्यारींच्या ‘मोदींच्या आधी विदेशात भारतीयांना किंमत नव्हती’ या विधानावरुन रोहित पवारांची टीका; म्हणाले, “मोदी हे…”

“एखाद्या तरुणाला मोठे राजकीय भवितव्य असताना अशी बदनामी केली जात असेल तर ते योग्य नसते, हे मी समजू शकतो. जेव्हा आपल्या कुटुंबातील माणसाची बदनमी होते तेव्हा किती वेदना होतात. त्यामुळे मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संपर्क साधला. वस्तुस्थिती त्यांच्या कानावर घातली. सुशांतसिंह प्रकरण जेव्हा घडले होते, तेव्हा नारायण राणे यांची पत्रकार परिषद मुंबईमध्ये भाजपा कार्यालयात झाली होती. आदित्य ठाकरे यांच्या बदनामीमुळे अनेक लोक नाराज झाले होते. अनेकांनी मोर्चे काढले होते,” असेही दीपक केसरकर म्हणाले.

हेही वाचा >>> शिवसेना फुटीनंतर उद्धव ठाकरेंना पहिलं यश, सोलापूरच्या चिंचपूर ग्रामपंचायतीमध्ये ठाकरे गटाचा झेंडा

दरम्यान, “केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याशी माझा कोणताही वैयक्तिक वाद नाही. त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मातोश्रीवर बोलणे टाळावे. त्यानंतर माझा कोणताही त्यांच्याशी वाद राहणार नाही, असे केसरकर याआधीही म्हणाले होते. तसेच किरीट सोमय्या मातोश्रीवर बोलण्याचे टाळू शकतात तर राणे यांना काय कठीण नाही, असा सवालही त्यांनी केला होता.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Deepak kesarkar alleges narayan rane tried to defame aditya thackeray in sushant singh rajput case prd