मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी त्यांची भेट घेतली आणि तब्येतीची विचारपूस केली. त्याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेसने या भेटीचं कनेक्शन शिंदे गटातील त्या ४० आमदारांसंदर्भातील चर्चाशी जोडलं आहे. शिवसेनेमध्ये बंड करुन महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडत भाजपासोबत सरकार स्थापन करणाऱ्या ४० बंडखोर आमदारांचा मनसेमध्ये समावेश करुन घेण्यासंदर्भात या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली की काय अशी शंका राष्ट्रवादीने उपस्थित केलीय.

नक्की पाहा >> Photos: ‘शिवतीर्थ’वर फडणवीसांचं औक्षण, भगवी शाल अन्…; राज ठाकरेंच्या घरी असा झाला उपमुख्यमंत्र्यांचा पाहुणचार

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी राज आणि फडणवीस यांच्या भेटीवर प्रतिक्रिया देताना ४० आमदारांचा मुद्दा उपस्थित केला. एकनाथ शिंदे नेतृत्व करत असणाऱ्या ४० आमदारांना भाजपामध्ये जायचं नसल्याने त्यांना मनसेमध्ये सामावून घेण्यासंदर्भातील चर्चा राज आणि फडणवीस यांच्यामध्ये झाली की काय अशी शंका तापसे यांनी व्यक्त केलीय.

नक्की वाचा >> राज ठाकरे – फडणवीस भेटीदरम्यान उपस्थित असणाऱ्या नांदगावकरांचं युतीसंदर्भात सूचक विधान; म्हणाले, “पवार साहेबांनी…”

“शिवसेनेच्या काही आमदारांनी बंड केला. हे आमदार कुठल्या पक्षात जातील याबद्दल उत्सुकता होती. हे आमदार भाजपामध्ये यावेत असा भाजपाचा प्रयत्न होता. पण आमदार भाजपामध्ये जायला तयार नाहीत. असं म्हटलं गेलं ते आमदार प्रहारमध्ये जातील पण ती परिस्थिती राहिलेली नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या बंडखोर आमदारांच्या गटाचं नेतृत्व करतायत. हे ४० आमदार नेमक्या कुठल्या गटाचे किंवा पक्षाचे आहेत? हा प्रश्न निर्माण झालाय,” असं तापसे म्हणाले. प्रसारमाध्यमांसाठी जारी केलेल्या व्हिडीओमधून त्यांनी ही शंका उपस्थित केली.

नक्की पाहा >> Photos: २०२० मध्ये शिंदेंचाच होता विरोध अन् काल मुख्यमंत्री म्हणून त्यांनीच केली ‘या’ निर्णयाची घोषणा; BJP ला होणार मोठा फायदा

पुढे बोलताना तापसे यांनी, “सर्वोच्च न्यायालयामध्ये घटनापिठाची स्थापना होऊन कायदेशीर लढाईला सुरुवात होणार आहे. त्यानंतरच हे सरकार वैध आहे की अवैध आहे हे आपल्याला कळेल. हे ४० आमदार मनसेमध्ये जातील का, अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. यासंदर्भातील प्रस्ताव फडणवीस राज ठाकरेकडे घेऊन गेले का, असा प्रश्न आमच्या मनामध्ये येतो,” असंही म्हटलं. “एकच आमदार असलेला पक्ष एका रात्रीत ४० आमदारांचा मालक होतो का अशा उलट सुलट चर्चा राज्यामध्ये सुरु झाल्यात. वास्तविक त्यांची काय चर्चा झाली माहिती नाही. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विरोधी पक्षाची भूमिका निभावण्यासाठी सक्षम आहे. शरद पवारांपासून ते सामान्य कार्यकर्त्यापर्यंत सर्वच जण पक्ष मजबूत करण्यासाठी काम करतोय,” असंही तापसे म्हणाले.

नक्की पाहा >> Photos: दिल्लीतही शिंदे गट? भाजपा अजून एका ‘मास्टरस्ट्रोक’च्या तयारीत; केसरकर म्हणाले “…तेव्हा उद्धव ठाकरेसुद्धा ऐकतील”

दरम्यान, दुसरीकडे ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्याने ही भेट घेतली व त्याबाबत विधिमंडळातच मी जाहीर केले होते. अन्य पक्षातील राजकीय नेत्यांशी संबंध ठेवणे, ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. मी राज ठाकरे यांना भेटल्याने कोणालाही मळमळ होण्याचे कारण नाही, असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Devendra fadnavis raj thackeray meet ncp mahesh tapase comment about 40 eknath shinde rebel mla connection scsg