Devendra Fadnavis : “मी आधुनिक अभिमन्यू, चक्रव्यूह भेदून…”, देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य चर्चेत

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना उत्तर देत त्यांना खडे बोल सुनावले आहेत.

What Devendra Fadnavis Said?
देवेंद्र फडणवीस विरोधकांकडून जी टीका केली जाते त्यावर काय म्हटलं आहे? (फोटो-देवेंद्र फडणवीस, एक्स पेज)

Devendra Fadnavis : लोकसभा निवडणुकांमध्ये महायुतीला अपेक्षित यश मिळालं नाही. देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात लोकसभेला ४० पेक्षा जास्त जागा निवडून येतील असा विश्वास व्यक्त केला होता. मात्र लोकसभेला महायुतीचे फक्त १७ खासदार आले. भाजपाला ९ जागांवरच यश मिळवता आलं. यानंतर देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांच्यावर टीका करण्यास सुरुवात झाली.

देवेंद्र फडणवीस यांच्यावर रोज टीका

देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे खलनायक आहेत ही टीका तर संजय राऊत करत आहेत. तसंच बदलापूर आणि शिवपुतळा घटनेवरुनही देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका झाली. तसंच मनोज जरांगेही सातत्याने मनोज जरांगेंवर टीका करत आहेत. औरंगजेब फॅन क्लबचे चेअरमन, महाराष्ट्रद्रोही, शिवरायांचं राज्य ज्यांनी घालवलं त्या पेशव्यांचे उत्तराधिकारी असंही संजय राऊत त्यांना म्हणाले. या सगळ्याबाबत आता देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी उत्तर दिलं आहे.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

“संजय राऊत यांना जळी-स्थळी मीच दिसत असेन तर ठीक आहे. दिवसरात्र ते माझ्यावरच बोलतात. महाराष्ट्रातल्या जनतेला देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) काय आहेत ते माहीत आहेत. विरोधकांना वाटतं की माझी इमेज डॅमेज करुन त्यांना वाटत असेल काही जागा काढू शकतील तर ते शक्य होणार नाही. मला कितीही दुषणं दिली, कितीही शिव्या दिल्या तरीही माझ्या नावावर लागलेली जी कामं आहेत, जे व्हिजन महाराष्ट्राला दिलं आहे त्यात माझ्याशी ते बरोबरीच करु शकत नाहीत. वर्षानुवर्षे तुम्ही राज्य चालवलं सांगा तुम्ही काय केलं? त्यांना उत्तरच देता येत नाही. मग मला अशा पद्धतीने टार्गेट केलं जाता. देवेंद्रवर रोज आरोप करा, रात्रंदिवस आरोप करा हे चालतं. माझ्याशी इतर कुठल्याही मुद्द्यावर स्पर्धा करता येत नाही. त्यामुळे मला वाटतं की ते मला किती मोठा नेता मानतात ते स्पष्ट होतं.” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

हे पण वाचा- “छत्रपती शिवरायांना लुटारु म्हणणं शरद पवारांना मान्य आहे का?”, देवेंद्र फडणवीसांचा सवाल

माझा अभिमन्यू होणार नाही

देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) तेरी खैर नही असं सुप्रिया सुळे म्हणाल्या त्याबाबत विचारलं असता देवेंद्र फडणवीस म्हणाले, मला ही आनंदाची गोष्ट वाटते, यातून राजकारणातलं स्थान लक्षात येतं. तुम्हाला फक्त एका व्यक्तीवरच हल्ला करावासा वाटतो, शरद पवारही तेच करतात, काँग्रेसही तेच करते. मनोज जरांगे तर आहेतच. पण एकच गोष्ट सांगतो यांना वाटतंय हे माझ्या विरोधात चक्रव्यूह तयार करत आहेत. मात्र त्यांना एकच सांगणार आहे की तुम्ही (विरोधक) चक्रव्यूह करुन माझा अभिमन्यू करण्याचा प्रयत्न करत असलात तरीही मी आधुनिक अभिमन्यू आहे, चक्रव्युहात कसं शिरायचं हे मला माहित आहे आणि बाहेर कसं यायचं आहे हे पण मला माहीत आहे. काहीही झालं तरीही माझा अभिमन्यू होणार नाही. असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. टीव्ही ९ मराठी कॉनक्लेवमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी हे वक्तव्य केलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Devendra fadnavis said i am abhimanyu of modern era i know how to break it scj

First published on: 06-09-2024 at 17:46 IST

आजचा ई-पेपर : महाराष्ट्र

वाचा
Show comments