लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सांगली: उमदी (ता. जत) येथील आश्रमशाळेतील विषबाधेप्रकरणी संस्थेच्या सचिवासह पाच जणांविरुध्द पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून समाज कल्याण विभागाने चौघांवर निलंबनाची कारवाई केली आहे. रविवारी रात्री उमदी येथील समता प्राथमिक, माध्यमिक ल उच्च माध्यमिक आश्रमशाळेतील १६८ विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा झाली होती. या प्रकरणी समाजकल्याण विभागाने चौकशी करुन कारवाईचा बडगा उगारला.

आश्रमशाळा चालविण्यात येणाऱ्या सर्वोदय शिक्षण संस्थेचे सचिव श्रीशैल होर्तीकर, दोन मुख्याध्यापक सुभाषचंद्र होर्तीकर, सुरेश बगली आणि दोन अधिक्षक विकास पवार, अक्कामहादेवी निवर्गी या पाच जणांवर समाजकल्याण विभागाने आश्रमशाळेत अन्न न तयार करता बाहेरील कार्यक्रमाचे शिल्लक अन्न देऊन मुलांच्या जिवीताला धोका निर्माण केल्याचा व हलगर्जीपणाचा ठपका ठेवत निलंबित केले आहे.

हेही वाचा… सांगली: उमदी आश्रमशाळेत १६९ विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा!

पाच जणांविरुध्द समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त जयंत चाचरकर यांनी उमदी पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Four people including principal suspended in case of poisoning in umdi ashram school sangli dvr