सातारा :सातारा कास पठारसह महाबळेश्वर, पाचगणी, वाई, जावली भागात दुपारी जोरदार पाऊस झाला. या पावसाने कास पठारावर फुलांचा व निसर्गसौंदर्याचा आनंद घेण्यासाठी आलेल्या पर्यटकांची एकच धावपळ उडाली. दरम्यान या पावसाने पुणे बंगळुरू महामार्गावर सखल भागात पाणी साचल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती.

मागील काही दिवस उघडीप घेतलेल्या पावसाने शनिवारी दुपारी जोरदार हजेरी लावली. या पावसाने सातारा शहरासह उपनगरांमध्ये पाणी पाणी झाले. सखल भागात पाणी साचले. आता पाऊस उघडला असे समजून बाहेर पडलेल्या नागरिकांना व कामकऱ्यांना अचानक आलेल्या पावसाने आडोसा शोधावा लागला.

सातारा, वाई, पाचगणी, महाबळेश्वर शहरात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे शेती पिकांना मदत झाली. मात्र अनेक भागांत घेवडा काढणीची लगबग सुरू आहे. पावसाने मजुरांचीही धावपळ उडाली.

कास पठारावरील फुलांचा हंगाम सुरू झाला आहे. त्यामुळे मुबई पुण्यासह सांगली सोलापूर साताऱ्यातील पर्यटक मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत. शनिवार, रविवार सुट्यांमुळे पठारावर मोठी गर्दी झाली आहे. दुपारपर्यंत पावसाचा अंदाज नव्हता. मात्र अचानक आलेल्या जोरदार पावसाने पर्यटकांची एकच धावपळ उडाली. आडोसा शोधेपर्यंत अनेक पर्यटक पावसात भिजले. जवळपास दीड तास पाऊस सुरू होता. पाऊस थांबल्यानंतर कास पठारावरील निसर्गसौंदर्य आणखी खुलले. पठारावर पावसासोबत ढग उतरल्याने याचा पर्यटकांनी आनंद घेतला.

दरम्यान या पावसाने पुणे बंगळुरू महामार्गावर सखल भागात पाणी साचल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. अजिंक्यतारा साखर कारखाना शेंद्रे येथे सातारा मॅरेथॉनच्या स्पर्धकांचा स्पर्धेपूर्वीचे साहित्य वितरणासाठी मेळा (एक्स्पो) भरला आहे. जवळपास आठ हजार स्पर्धकांनी येथे गर्दी केली आहे. त्यांचीही धावपळ झाली. एकूणच झालेल्या पावसाने सगळ्यांची एकच धावपळ झाली.

या पावसाने सातारा शहरासह उपनगरांमध्ये पाणी पाणी झाले. सखल भागात पाणी साचले. आता पाऊस उघडला असे समजून बाहेर पडलेल्या नागरिकांना व कामकऱ्यांना अचानक आलेल्या पावसाने आडोसा शोधावा लागला. मागील काही दिवस उघडीप घेतलेल्या पावसाने शनिवारी दुपारी जोरदार हजेरी लावली. या पावसाने सातारा शहरासह उपनगरांमध्ये पाणी पाणी झाले. सखल भागात पाणी साचले.

आता पाऊस उघडला असे समजून बाहेर पडलेल्या नागरिकांना व कामकऱ्यांना अचानक आलेल्या पावसाने आडोसा शोधावा लागला. सातारा, वाई, पाचगणी, महाबळेश्वर शहरात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे शेती पिकांना मदत झाली. मात्र अनेक भागांत घेवडा काढणीची लगबग सुरू आहे. पावसाने मजुरांचीही धावपळ उडाली.