कराड : पुणे-बंगळूरु महामार्गावरील तासवडे पथकर नाक्यावर तळबीड पोलिसांनी टेम्पोसह १० लाख ३० हजार रुपयांचा गुटखा पकडला. तर विकास वसंत जाधव (३५, रा. गणेश चौक, कोडोली, सातारा) याला अटक केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : Manoj Jarange : “मुख्यमंत्री साहेब, अन्यथा तुम्हाला पश्चात्ताप होईल”, मनोज जरांगेंचा मस्साजोगच्या घटनेवरून देवेंद्र फडणवीसांना इशारा

पोलिसांच्या माहितीनुसार महामार्गावर रात्रीच्या सुमारास निपाणी (कर्नाटक) येथून टेम्पो गुटखा घेऊन जाणार असल्याची माहिती तळबीडचे प्रभारी किरण भोसले यांना मिळाली होती. त्यानुसार तासवडे पथकर नाक्यावर नाकाबंदी करून टेम्पोची झडती घेतली असता त्यामध्ये १० लाख ३० हजार रुपये किमतीचा गुटखा मिळून आला. पोलिसांनी टेम्पोसह १० लाख ३० हजार रुपये किमतीचा गुटखा जप्त केला आहे. तळबीड पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित विकास जाधवला पोलिसांनी अटक केली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In karad gutkha of 10 lakh rupees seized at tasawade toll plaza css