सातारा : शिरवळ (ता. खंडाळा) येथे मंगळवारी सायंकाळी मुख्य रस्त्यावर (मेन रोड) पूर्ववैमनस्यातून दुचाकीवरून आलेल्या दोन युवकांनी गोळीबार केल्याने एक चाळीस वर्षीय युवक गंभीर जखमी झाला. रियाज उर्फ मिन्या इकबाल शेख (बाजारपेठ, शिरवळ) असे जखमी युवकाचे नाव आहे. भर बाजारपेठेत गर्दीच्या वेळी सायंकाळी अचानक झालेल्या गोळीबाराने शिरवळ येथे एकच खळबळ उडाली आहे. गोळीबारानंतर युवक दुचाकीवरून पसार झाले.
याप्रकरणी शिरवळ पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. यापैकी तिघांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे यांनी दिली.
घटनास्थळी अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांच्यासह शिरवळ पोलीस व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी व फॉरेन्सिक पथकाने धाव घेतली. या घटनेची नोंद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, बुधवारी सायंकाळी तीन जणांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. शिरवळ बाजारपेठेतील मुख्य रस्त्यावर सायंकाळच्या सुमारास गर्दी असताना दुचाकीवरून आलेल्या दोघांनी रियाज उर्फ मिन्या इकबाल शेख याच्यावर गोळीबार केला. त्याच्यावर दोन गोळ्या झाडल्या. या गोळीबारात रियाज गंभीर जखमी झाला. त्याला तत्काळ उपचारासाठी येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
गोळीबार करण्यापूर्वी दोघांपैकी एक युवक दुचाकीवरून उतरून रियाज शेख यांच्या दिशेने येत अचानकपणे गोळीबार करत असल्याचे दिसताच शेख याने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. हल्लेखोरांनी त्याचा पाठलाग केला. यामध्ये दोघांमध्ये झटापट झाली. यातच हल्लेखोराने दोन गोळ्या शेखच्या बाजूने झाडल्या. रियाज शेख याच्या उजव्या हाताला गोळी लागून तो जखमी झाला.
भर बाजारपेठेत गर्दीच्या वेळी सायंकाळी अचानक झालेल्या गोळीबाराने शिरवळ येथे एकच खळबळ उडाली आहे. गोळीबारानंतर युवक दुचाकीवरून पसार झाले. याप्रकरणी शिरवळ पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. यापैकी तिघांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे यांनी दिली.
घटनेची माहिती मिळताच तत्काळ घटनास्थळी अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांच्यासह शिरवळ पोलीस व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी व फॉरेन्सिक पथकाने धाव घेतली. या घटनेची नोंद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, बुधवारी सायंकाळी तीन जणांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे करत आहेत.