महाविकास आघाडी अडचणीत नाही. महाविकास आघाडीकडे बहुमत आहे. त्यामुळे आघाडीचा चौथा उमेदवार चांगल्या मतांनी विजयी होईल अशी खात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केली. आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे बैठक झाल्यानंतर जयंत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी वरील वक्तव्य केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >> प्रेषित मोहम्मद अवमान प्रकरण : नुपूर शर्मांच्या अडचणी वाढणार? मुंब्रा पोलिसांनी बजावली नोटीस!

“अपक्षांशी विविधस्तरावर चर्चा सुरू आहे. योग्यवेळी याबाबत आपल्याला माहिती दिली जाईल. वेगवेगळ्या कारणांनी वेगवेगळ्या वेळी लोकांची नाराजी होत असते. परंतु समाजवादी पक्ष हा उत्तरप्रदेशमध्ये भाजपविरोधी राहिलेला आहे. त्यामुळे ते महाविकास आघाडी सरकारला पाठिंबा देतील,” अशी खात्रीही जयंत पाटील यांनी व्यक्त केली.

हेही वाचा >> राज्यसभा निवडणूक : पाठिंब्यासाठी एमआयएमकडे मदत कोण मागणार? नाना पटोले यांनी स्पष्टच सांगितलं

“सध्या करोनाची साथ आहे. कोरोनामुळे सर्व आमदार हे मुंबईत असावेत आणि मतदानासाठी उपलब्ध असावेत यासाठी हे सर्व सुरु आहे. मतं तर दाखवूनच द्यायची असतात त्यामुळे कुणी कुणाला पळवण्याचा प्रश्नच येत नाही,” असेही जयंत पाटील म्हणाले.

हेही वाचा >> सलमान खानला बिष्णोई गँगनं दिली धमकी? म्होरक्याच्या चौकशीनंतर दिल्ली पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती!

“मोर्चेबांधणीचा प्रयत्न भाजप करणारच. या निवडणुका बिनविरोध व्हायला हव्या होत्या. जो उमेदवार निवडणूक रिंगणात आहे; तो मतं मिळवण्यासाठी प्रयत्न करणारच त्यात दोष देण्याची गरज नाही. पण मुळातच महाविकास आघाडी सरकारला सुरुवातीला १७० आमदारांनी पाठिंबा दिलेला होता त्यामुळे सर्व उमेदवार निवडून येतील,” असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

हेही वाचा >> विवाहितेने चिमुरडीसह गळफास घेतला; महिलेचा मृत्यू, मुलगी बचावली

“आज विधानसभेच्या सर्व सदस्यांना महाविकास आघाडीकडून सूचना गेल्या आहेत. बहुसंख्य आमदार मुंबईत दाखल झाले आहेत. त्या सर्वांसाठी ही बैठक होती असेही जयंत पाटील यांनी सांगितले. दरम्यान विधानपरिषदेसाठी चर्चा सुरू असून दोन जागा आमच्या असून दोन जागांसाठी चर्चा सुरू आहे. त्याचा योग्यवेळी निर्णय जाहीर करु असे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jayant patil said out fourth candidate in rajya sabha elections 2022 will definitely win prd