राज ठाकरे यांनी मुंबईतील शिवाजी पार्कवर झालेल्या सभेत माहीम भागातील समुद्रात अनधिकृत बांधकाम झाल्याचा दावा केला होता. तसेच त्यांनी यासंदर्भातील एक व्हिडीओसुद्धा दाखवला होता. दरम्यान, यावरून आता राज्यातील राजकीय वातावरण तापू लागलं असून याबाबत विविध राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. दरम्यान, भाजपानेही या बांधकामावरून उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – “राज ठाकरेंनी मुद्दा उपस्थित केला अन् शिंदे-फडणवीस सरकारने…”; माहीम कबरीच्या वादावर चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया

भाजपाचं उद्धव ठाकरेंवर टीकास्र

भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्वीट करत उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्र सोडलं. हिंदुत्वाचे गप्पा मारणारे उद्धव ठाकरे आणि संजय राऊत सत्तेत असताना याकुब मेननच्या कबरीवर सुशोभिकरण झालं. माहीममध्ये समुद्रात अतिक्रमण उभे राहिले आणि सरकारने अफजलखानाच्या कबरीला सरंक्षण दिले. हेच यांच बेगडी हिंदुत्व आहे, असे ते म्हणाले.

राज ठाकरेंनी दिला होता इशारा

राज ठाकरे यांनी बुधवारी गुढीपाडव्याच्या मेळाव्यात बोलताना माहीम भागातील समुद्रात अनधिकृत बांधकाम झाल्याचं म्हटलं होतं. यावेळी त्यांनी एक व्हिडीओत दाखवत हे बांधकाम एका महिन्याच्या आता पाडा अन्यथा याच्या शेजारी आम्ही गणपतीचे मंदिर बांधू असा इशारा राज्य सरकार आणि प्रशासनाला दिला होता.

हेही वाचा – गुढीपाडव्याच्या सभेत राज ठाकरेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका; संजय राऊत म्हणाले; “१८ वर्षांनंतरही त्यांना…”

प्रशासनकडून कारवाई

दरम्यान, राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांकडून हे बांधकाम पाडण्यासाठी सहा अधिकाऱ्यांचे पथक नियुक्त करण्यात आले होते. त्यानुसार आज सकाळी मुंबई महालिकेकडून या जागेची पाहणी करण्यात आली. त्यानंतर हे बांधकाम पाडण्यात आलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Keshav upadhye criticized uddhav thackery after raj thackeray video on mahim majar video spb