Ghatkopar Hoarding Collapse Mumbai : मुंबई, ठाणे जिल्ह्याला काल अवकाळी पावसाने झोडपले. वादळी वाऱ्यासह पडलेल्या पावसामुळे मुंबईत अतोनात नुकसान झाले. घाटकोपर येथील होर्डिंग कोसळल्याने १४ जणांचा मृत्यू झाला, तर वडाळ्यात पार्किंग टॉवर कोसळल्याने एकाचा मृत्यू झाला. तसंच, मध्य रेल्वे ठप्प झाली होती, मेट्रो सेवा खंडित झाली होती. तासभर पडलेल्या पावसामुळे मुंबईबाहेर राहणाऱ्या चाकरमन्यांची चांगलीच कोंडी झाली. दरम्यान, दुसरीकडे संजय राऊत यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे एकनाथ शिंदे यांची तक्रार केली आहे. नाशिक पालिकेत झालेल्या ८०० कोटींच्या भूसंपादन घोटाळ्याप्रकरणी त्यांनी हे पत्र लिहिले आहे. तसंच, काल चौथ्या टप्प्यातील मतदान पार पडले. या टप्प्यातील मतदान प्रक्रियेदरम्यान अनेक मतदान केंद्रावर गोंधळ पाहायला मिळाला. त्याचे पडसाद आजही उमटण्याची शक्यता आहे. त्यामुळे यासह राज्यातील विविध घडामोडी जाणून घेऊयात.
Marathi News Live Today, 14 May 2024 : राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा
नागपूरः गुन्हेगारी कारवायांमध्ये सहभागी असणाऱ्या एका पोलीस हवालदाराला आणि रेल्वेत विनयभग करणाऱ्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर पोलीस आयुक्तांनी कारवाई केली.
नागपूर : रामटेक वनपरिक्षेत्रातून जेरबंद केलेल्या वाघाचा मृत्यू झाल्याने वनखात्याच्या भूमिकेवर संशय निर्माण झाला आहे. काही दिवसांपूर्वी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात खात्यानेच त्या वाघाने २०-२२ जनावरे मारल्याचे नमूद केले होते आणि आता दहा दिवसानंतर दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात खाते त्या वाघाने ४० पेक्षा जास्त जनावरे मारल्याचे सांगत आहेत.
नागपूर : रेल्वेत विकला जाणारा चहा शौचालयातील पाण्याचा वापर करून तयार केला जात असल्याची चित्रफीत प्रसारित झाली आहे. रेल्वेतून प्रवास करीत असताना अनधिकृत विक्रेत्यांकडून प्रवाशांनी चहा घेऊ नयेत, असे आवाहन भारतीय यात्री केंद्राने प्रवाशांना केले आहे. रेल्वेतील चहा विक्रेते शौचालयातील पाण्याचा वापर करून थर्मोसेसमधून चहाची विक्री करीत असल्याचे चित्रफीत प्रसारित झाली आहे. तेव्हा प्रवाशांनी अशा विक्रेत्यांकडून चहा घेतल्यानंतर आरोग्याचा प्रश्न गंभीर होण्याची भीती वाढली आहे.
नागपूर : ओंकारनगर परिसरात ऑटोरिक्षा चालकाने एका विद्यार्थिनीचा लैंगिक छळ केल्याचे पुढे आल्यावर अजनी पोलिसांनी स्वत:हून गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली.
२०२०-२२ या काळात शहराच्या विकासाच्या आरक्षित जमिनीच्या संपादनाची गरज आहे असा भास निर्माण केला आणि महापालिकेतील सत्ताधारी भाजपाच्या मागणीनुसार नगरविकास विभागाने १७५ कोटी रुपयांची भूसंपादनाची कार्यवाहीची परवानगी दिली. जेवढी आवश्यक आहे तेवढीच जमिन भूसंपादन करावं अशा सूचना होत्या. नगरविकास खात्याच्या या नेतृत्त्वाने नाशिकमधील बिल्डरलॉबीचा फायदा व्हावा म्हणून १५७ कोटी रुपयांची परवानगी असताना भाजपा पदाधिकारी, प्रशासन आणि बिल्डरांच्या लाभासाठी ८०० कोटींचं भूसंपादन केलं. हे ८०० कोटी रुपये ठराविक बिल्डरांच्या घशात टाकले. शासनाने ठरवून दिलेले जे प्राधान्यक्रम होते त्या कोणत्याही नियमांचं पालन केलं नाही. त्यातील काही बिल्डर मुख्यमंत्र्यांबरोबर व्यासपीठावर होते. ठक्कर नावाचे बिल्डर. काही बिल्डरांनी त्या काळात जमिनी विकत घेतल्या, शेतकरी नसतानाही जमिनी विकत घेतल्या. त्या जमिनी एका महिन्यात पाच पटीने वाढवून महापालिकेकडून कोट्यवधी रुपये घेतले. असे ५७ जमिनी आहेत. छगन भुजबळ तेथील पालकमंत्री असून त्यांनी याबाबत पत्र लिहिले होते. त्यांनी चौकशीची विनंतीही केली होती. अनेक बिल्डरांनी शेतकरी असल्याचं दाखवून पालिकेशी व्यवहार केला – संजय राऊत</p>
मनवाणी, ठक्कर आणि शाह या बिल्डरांचं नावं घेत राऊत म्हणाले, ठक्कर बिल्डरला ३५५ कोटींचा लाभ झाला, मनवानी बिल्डरांना ५३ कोटींचा लाभ झाला, शाह नावाच्या बिल्डरांना ८ कोटींचा लाभ झाला. इतर बिल्डरांना २०० कोटींचा लाभ झालाय. महापालिकेच्या अधिकारी आणि क्लर्कना १२ कोटींचा लाभ झालाय. खासगी वाटाघटी करत भूसंपादन झालं आहे.
Marathi News Live Today, 14 May 2024 : राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा