Mumbai Maharashtra News Today -महाराष्ट्राच्या राजकारणात विविध घडामोडी घडताना दिसत आहेत. संजय राऊत हे राष्ट्रवादीत जातील असा दावा नितेश राणे यांनी केला आहे. तर शरद पवार हे मागच्या सात दिवसांपासून चर्चेत आहेत. आज सामनाच्या अग्रलेखात शरद पवारांनी वारस तयार केला नाही असं म्हटलं गेलं आहे. यावर शरद पवारांनीही भाष्य केलं आहे. आपण सामना वाचला नाही. पण शिवसेना महाविकास आघाडीचा घटक आहे त्यामुळे योग्य तीच भूमिका त्यांनी घेतली असेल असं वाटतं तसंच वारस तयार केला गेला नाही हे त्यांचं व्यक्तिगत मत असू शकतं असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी बारसूचा दौरा केला या प्रकल्पाला विरोध दर्शवला आहे. महाराष्ट्रातल्या सत्ता संघर्षाचा निकाल या आठवड्यात लागू शकतो अशीही शक्यता वर्तवली जाते आहे. या सगळ्या घडामोडींसह दिवसभरात काय काय घडणार या जाणून घ्या लाइव्ह ब्लॉगच्या माध्यमातून.
Mumbai News Live Update|महाराष्ट्रच्या सत्तासंघर्षाचा निकाल याच आठवड्यात लागणार का?
वर्धा : विद्यार्थी दशेत सर्वात अधिक खेळला जाणारा खेळ म्हणून क्रिकेटची ओळख आहे. शाळेत किंवा उन्हाळी सुट्टीत याच खेळावर विद्यार्थांच्या उड्या पडतात. मात्र शाळेतील खेळाडूंसाठी दिल्या जाणाऱ्या सवलतीच्या गुणास ते पात्र ठरत नसल्याची बाब पुढे आली आहे.
गोंदिया : जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकपदांसाठी निवडणूक नुकतीच पार पडली. संचालकपदांच्या निवडणुकीनंतरही सभापती व उपसभापती पदांसाठी निवडणूक होणार असून, आपल्याच पक्षाचा सभापती व उपसभापती असावा, यासाठी राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीस सुरुवात केली आहे.
महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षावर याच आठवड्यात निकाल येणं अपेक्षित आहे. तसंच इतरही महत्त्वाच्या घडामोडी राज्यात घडत आहेत जाणून घ्या त्याबाबत.