Mumbai Maharashtra Weather News Highlights: महाराष्ट्रात पुढील तीन दिवस मुसळधार पाऊस बरसेल, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सातारा व पुण्याला रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. तर, सिंधुदुर्ग, आहिल्यानगर, कोल्हापूर, सोलापूर, सांगली, बीड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुंबईत पुढील २४ तास मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून सकाळपासून चालू असलेल्या रिमझिम पावसामुळे शहर व उपनगरातील अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत.
दरम्यान, राज्यात दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी रस्ते बंद आहेत. त्यामुळे या तीन दिवसांत होणाऱ्या परीक्षा स्थगित करण्यात याव्या, अशी मागणी आमदार व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे. पावसाचा शेतकऱ्यांनाही मोठा फटका बसला आहे. या पावसामुळे राज्यातील ३५ हजार हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं आहे. उन्हाळी कांदा, कडधान्ये मातीमोल झाली आहेत. पावसाचा प्रामुख्याने अमरावती, जालना, जळगाव, नाशिक, चंद्रपूर व आहिल्यानगरमधील शेतकऱ्यांना सर्वाधिक फटका बसला आहे.
Mumbai Maharashtra News Live Today : राज्यातील महत्त्वाच्या बातम्या व पावसाचे अपडेट्स एकाच क्लिकवर.
कौटुंबिक वादातील भरडल्या जाणाऱ्या मुलांसाठी स्वतंत्र वकील द्या, जनहित याचिकेद्वारे मागणी
नवी मुंबई : बेशिस्त रिक्षाचालकांवर कारवाई, २ हजार १४२ रिक्षाचालकांकडून तीन लाखांचा दंड वसूल
मुंबईत रिमझिम पाऊस, लोकल सेवा सुरळीत असल्यामुळे प्रवाशांना दिलासा
मुंबईत आज सकाळपासून रिमझिम पाऊस चालू असला तरी मुंबईची जीवनवाहिनी म्हणजेच लोकल सेवा सुरळीत असल्याचं रेल्वे प्रशासनाने सांगितलं आहे. पश्चिम रेल्वे व हार्बर रेल्वेवरील लोकल गाड्या वेळेवर धावत आहेत. तर मध्य रेल्वेवरील वाहतूक १० ते १५ मिनिटे उशिराने चालू आहे.
मुंबई : महाविद्यालयीन प्रवेशाची प्रतीक्षा करताय… प्रथम वर्ष पदवी प्रवेशाची आज पहिली गुणवत्ता यादी
पहिल्याच पावसात मुंबई गोवा महामार्गाची दुरावस्था; लोणेरे, टेमपाले, कोलाड येथील सर्व्हीस रोड खड्ड्यात
Dhule Solapur Highway Accident Updates: छत्रपती संभाजीनगर : गेवराईजवळ मालमोटारीने सहा जणांना चिरडले
बाळासाहेब आतकरे, मनोज करांडे, कृष्णा जाधव, दीपक सुरय्या, भागवत परळकर व सचिन ननवरे, अशी मृतांची नावे असल्याची माहिती मिळाली.
Nashik Onion Farmers Loss: नाशिकमध्ये आतापर्यंत तीन हजार हेक्टरवरील कांद्याचे नुकसान, शासकीय निकषामुळे भरपाईत अडथळे
सहा मेपासून जिल्ह्यात पाऊस सुरू असून आतापर्यंत साडेसहा हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.