Maharashtra Political Crisis Updates, 16 November 2022 : राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली निघालेली काँग्रेसची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात आहे. ही पदयात्रा शेगावमध्ये पोहचल्यावर तिथे मोठी ऐतिहासिक सभा होणार असून, या सभेस काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी उपस्थित राहणार आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी ही माहिती दिली आहे.

याशिवाय विरोधकांकडून जितेंद्र आव्हाडांच्या अनंत करमुसे मारहाण प्रकरणाचा दाखला देत आव्हाडांवर टीकास्र सोडलं जात आहे. त्यामुळे आव्हाडांनी यावर खुलासा करणारं एक ट्वीट केलं असून त्यामध्ये अनंत करमुसे नावाच्या सोशल प्रोफाईलचे काही स्क्रीनशॉटही शेअर केले आहेत.

तर मुंबईत गोवर आजाराची साथ प्रचंड वेगाने पसरत असतानाच त्यापाठोपाठ ठाणे जिल्ह्यातील भिवंडी शहरात गोवरची साथ पसरल्याचे समोर आले आहे. या आजाराचे २७१ संशयीत रुग्ण आढळून आले आहेत.

यासह राज्यभरातील विविध क्षेत्रातील सविस्तर बातम्या वाचा फक्त एका किल्कवर

Live Updates

Marathi News Today, 16 November 2022 : यासह राज्यभरातील विविध क्षेत्रातील सविस्तर बातम्या वाचा फक्त एका किल्कवर

11:13 (IST) 16 Nov 2022
वरळीत नव्हे, तर मूळ जागीच घरे हवीत; बीडीडी चाळीतील झोपडीधारकांची सरकारकडे मागणी

मुंबई : वरळी, ना. म. जोशी मार्ग आणि नायगाव येथील पात्र झोपडीधारकांना झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत पुनर्विकासात सामावून घेण्यात येणार आहे. तिन्ही ठिकाणच्या पात्र झोपडीधारकांना एकत्रितपणे वरळीमध्ये घरे देण्यात येणार आहेत. बातमी वाचा सविस्तर…

11:13 (IST) 16 Nov 2022
सावधान! “विजेचे बिल न भरल्याने पुरवठा खंडित करीत आहेत”, फोन आल्यास करु नका आर्थिक व्यवहार

नवी मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून विजेचे देयक (बील) भरले नसल्याचा फोन अनेकांना येत आहे. वास्तविक हे फोन फसवणूक करणाऱ्यांचे येत आहे आणि त्यांचा आणि महावितरणाचा काहीही सबंध नसतो. बातमी वाचा सविस्तर…

11:11 (IST) 16 Nov 2022
“भारतात राहणारी प्रत्येक व्यक्ती हिंदू”, मोहन भागवत यांचे विधान; म्हणाले, “जो व्यक्ती देशाला…”

“भारतात राहणारी प्रत्येक व्यक्ती हिंदू आहे आणि सर्व भारतीयांचा डीएनए एकच आहे”, असं सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटलं आहे. कोणालाही पूजा करण्याची पद्धत बदलण्याची गरज नाही, कारण सर्व प्रार्थना एकाच ठिकाणी जातात, असंही ते म्हणाले आहेत.

सविस्तर बातमी वाचा…

11:10 (IST) 16 Nov 2022
“भारतातील कफ सिरपमुळे मुलांचा मृत्यू लज्जास्पद” गांबियातील घटनेवर नारायण मूर्तींनी दर्शवली नाराजी

भारतात तयार झालेल्या कफ सिरपमुळे आफ्रिकेच्या गांबियामध्ये ६६ लहान मुलांचा मृत्यू झाला होता. ही घटना देशासाठी लज्जास्पद असल्याचे ‘इन्फोसिस’चे संस्थापक एन. आर. नारायण मूर्ती यांनी म्हटले आहे. यामुळे देशातील औषध नियामक एजन्सीच्या विश्वासाहर्तेला धक्का बसला आहे, असेही मूर्ती म्हणाले आहेत.

सविस्तर बातमी वाचा…

10:56 (IST) 16 Nov 2022
‘सेल्फी विथ शौचालय’, ऑनलाईन स्पर्धेचा विषय ऐकताच शिक्षकही चक्रावले

नाशिकमध्ये ‘जागतिक शौचालय दिन’ सर्व शाळांमध्ये उत्साहात साजरा करण्याची जय्यत तयारी सुरू आहे. त्या अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजित विविध स्पर्धांमध्ये ‘शौचालयासह सेल्फी’ हा ऑनलाईन उपक्रम राबवण्यात येणार आहे. त्यामध्ये स्वच्छ आणि आरोग्यदायी शौचालयासह सेल्फी काढणे, असा विषय देण्यात आला आहे. ऑनलाईन स्पर्धेतील हा विषय बघून शिक्षकही अवाक झाले आहेत. वाचा सविस्त बातमी…

10:53 (IST) 16 Nov 2022
ठाण्यातील भिवंडी शहरात गोवरची साथ; २७१ संशयित रुग्णांमध्ये ३७ रुग्ण गोवर रुबेला बाधीत

मुंबईत गोवर आजाराची साथ प्रचंड वेगाने पसरत असतानाच त्यापाठोपाठ ठाणे जिल्ह्यातील भिवंडी शहरात गोवरची साथ पसरल्याचे समोर आले आहे. या आजाराचे २७१ संशयीत रुग्ण आढळून आले आहेत. वाचा सविस्तर बातमी…

आता विरोधकांकडून जितेंद्र आव्हाडांच्या अनंत करमुसे मारहाण प्रकरणाचा दाखला देत आव्हाडांवर टीकास्र सोडलं जात आहे. त्यामुळे आव्हाडांनी यावर खुलासा करणारं एक ट्वीट केलं असून त्यामध्ये अनंत करमुसे नावाच्या सोशल प्रोफाईलचे काही स्क्रीनशॉटही शेअर केले आहेत.