Maharashtra Breaking News Live: राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन मुंबईत सुरू झालं असून आज अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे. गेल्या दोन दिवसांत किरीट सोमय्यांच्या कथित व्हिडीओ क्लिपप्रकरणी सभागृहात विरोधकांची आक्रमक भूमिका पाहायला मिळाली. तसेच, नीलम गोऱ्हेंनी शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे त्यांच्यावरील अपात्रतेच्या मागणीचा मुद्दाही अधिवेशनात गाजला. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप होताना अधिवेशनात पाहायला मिळत आहेत.
Mumbai Maharashtra Latest News Live: किरीट सोमय्या कथित व्हिडीओ प्रकरणावरून अधिवेशनात विरोधक आक्रमक!
एकनाथ शिंदे म्हणतात, “आपल्या देशाची बदनामी दुसऱ्या देशात करण्याचा एकच अजेंडा असणाऱ्यांना ‘इंडिया’ हे नाव ठेवण्याचा अधिकार नाही. सगळे…!”
किरीट सोमय्यांच्या व्हिडीओचा पेनड्राईव्ह मी सभापतींकडे दिला आहे. तो पाहून त्या कारवाई करतील. पण भाजपा साधनशुचितेचा पक्ष म्हणून मिरवतो. जर असं कृत्य सामान्य कार्यकर्त्याने केलं असतं तर त्याच्यावर आत्तापर्यंत कारवाई झाली असती – अंबादास दानवे</p>
Mumbai Maharashtra Latest News Live: नीलम गोऱ्हेंवरील अपात्रतेच्या कारवाईसाठी विरोधक अधिवेशनात आक्रमक!