Dahi Handi 2025 Live Updates News: दहीहंडीनिमित्त आज संबंध महाराष्ट्रात जल्लोष आणि उत्सहाचे वातावरण आहे. अनेक दिवसांपासून सर्वाधिक थर लावण्याचा सराव करणारे गोविंदा पथक आज विविध ठिकाणी थर लावून बक्षीस मिळविण्याचा प्रयत्न करताना दिसतील. ठाणे शहरात सकाळ पासून ठाण्यासह मुंबईतील गोविंदा पथक दाखल झाले आहेत. विविध दहीहंडी आयोजकांकडे या पथकांनी थर रचले. त्यातील काहीजणाचे थर अचूक लागले तर, काहींचे कोसळले. पण,या चुरशीमध्ये पाच ते सहा गोविंदा जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. यातील तीन गोविंदांवर कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
दहीहंडी बांधताना तरुणाचा मृत्यू
मुंबई-ठाण्यामध्ये उंच दहीहंडी फोडण्यासाठी थर रचण्यात गोविंदा पथके व्यग्र असतानाच उत्सवाला गालबोट लागले. मानखुर्द परिसरात बाल गोविंदांसाठी दहीहंडी बांधणाऱ्या एका गोविंदाचा पडून मृत्यू झाला. तर ठिकठिकाणी दहीहंडी फोडण्यासाठी रचलेल्या थरांवरून कोसळून ३० जण जखमी झाले.
विविध राजकीय पक्ष आणि संघटनांकडून दहीहंडी उत्सव आयोजित केले जात असतात. या उत्सवाशी संबंधित सर्व घडामोडी या ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घ्या.
Mumbai Thane Dahi Handi and Rains News Live Update | मुंबई, ठाण्यातील दहीहंडी आणि पावसाशी निगडित बातम्या
‘गोविंदा रे गोपाळा”, गोपाळकाला आणि दहीहंडीनिमित्त प्रियजनांना WhatsApp, Instagram, Facebook वर पाठवा ‘या’ खास शुभेच्छा; पोस्ट करा सुंदर HD Images
गोपाळकाला आणि दहीहंडीच्या शुभेच्छा तुमच्या प्रियजनांना आणि मित्र मंडळीना पाठवा. सविस्तर वाचा
दहीहंडी उत्सवात राजकीय पक्षांची चढाओढ
मुंबई : जखमी गोविंदावर उपचार करण्यासाठी रुग्णालये सज्ज
Dahihandi 2025 News : ठाणे जिल्ह्यात फुटणार तब्बल १ हजार ३३२ हंडी
दहीहंडी २०२५ : ठाण्यात दहीहंडीचा उत्साह शिगेला, कुठे असणार सर्वात मोठी हंडी? किती बक्षीस? दृष्टीहीन गोविंदा पथक विशेष लक्ष वेधून घेणार..
कायदा सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर दहीहंडी साजरी करण्याचा उच्च न्यायालयाचा निर्णय (संग्रहित छायाचित्र)