Maharashtra News Highlights: शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी तसेच सुमारे २२ विविध मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते आणि माजी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले जात आहे. या आंदोलनात मोठ्या प्रमाणात शेतकरी सहभागी झाले आहेत. दरम्यान रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोनवरून दिलेले चर्चेचे दिलेले निमंत्रण कडू यांनी स्वीकारले आहे. मात्र याबरोबरच राष्ट्रीय महामार्गावरील ठिय्या आंदोलन नियोजित ठिकाणी सुरू राहणार असल्याची घोषणाही कडू यांनी केली आहे. मुख्यमंत्र्‍यांबरोबरच्या चर्चेत काय तोडगा निघणार हे पहावे लागणार आहे. दुसरीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून आज मेळावा घेतला जाणार आहे. ज्यामध्ये मतदार याद्यांमधील घोळाबाबत प्रझेंटेशन दिले जाण्याची शक्यता आहे.

तर मोंथा चक्रीवादळाचा परिणाम राज्यातही पाहायला मिळत आहे. चक्रीवादळामुळे निर्माण झालेल्या स्थितीत मराठवाड्यातील लातूर, बीड, धाराशिव जिल्ह्यास पुन्हा पावसाने झोडपले. आजही राज्यातील विविध भागात पावसाची शक्यता आहे. या सर्व घडामोडींकडे आपले लक्ष असणार आहे.

Live Updates

Maharashtra Weather Today Live Updates : राज्यातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर

12:14 (IST) 30 Oct 2025

निवृत्तीवेतनाच्या भानगडी? आता त्या दूर करणारी सुविधा १ नोव्हेंबरपासून होणार उपलब्ध…

ऑनलाईन माध्यमातून या तक्रारी दूर करता आल्या पाहिजे म्हणून यासाठी निवृत्तीवेतन वाहिनी ही सुविधा उपलब्ध करून देण्याचा विचार झाल्याचे वित्त विभागाने स्पष्ट केले आहे. …अधिक वाचा
12:01 (IST) 30 Oct 2025

खारेगाव येथे नियंत्रक शिधावाटप विभागाची गॅस टॅंकरवर मोठी कारवाई; ५० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

फिरत्या पथकाने बुधवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास कळवा खारेगाव परिसरात अचानक छापा टाकला असता, टॅंकरमधून व्यावसायिक गॅस सिलेंडरमध्ये अवैधरित्या गॅस भरण्याचा प्रकार उघडकिस आला. …सविस्तर वाचा
11:56 (IST) 30 Oct 2025

तळोज्यात दोन हृदयद्रावक आत्महत्या; विद्यार्थिनीचा मानसिक ताण व विवाहितेचा हुंडाबळी

तळोज्यात १९ वर्षीय विद्यार्थिनीने इमारतीवरून उडी मारून, तर विवाहितेने हुंडाबळीमुळे गळफास घेऊन आत्महत्या केली. दोन्ही घटनांनी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. …वाचा सविस्तर
11:46 (IST) 30 Oct 2025

ठाणे महापालिकेची पाणी देयक वसुली मोहीम सुरू; थकबाकीदारांची नळ जोडणी खंडित करण्याची कारवाई सुरू

पाणी देयकांचे उदीष्ट पुर्ण करण्यासाठी ठाणे महापालिकेने पाणी देयकांच्या वसुलीसाठी विशेष मोहीम हाती घेतली असून, यात थकबाकीदारांची नळ जोडणी खंडित करण्याची कारवाई सुरू करण्यात येत आहे. …सविस्तर बातमी
11:43 (IST) 30 Oct 2025

Farmers Protest Nagpur : सरकारकडून शेतकरी आंदोलकांची फसवणूक; चर्चेचा प्रस्ताव देऊन नेत्यांना अटक

ही कारवाई अचानकपणे करण्यात आली असून त्यामुळे शेतकरी संघटनांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. शेतकरी नेते अजित नवले यांनी या अटकेचा निषेध नोंदवला आहे. …सविस्तर वाचा
11:36 (IST) 30 Oct 2025
“चांगला निर्णयही कधीकधी विरोधात वाटत असतो”, मुख्यमंत्र्यांच्या भेटीपूर्वी बच्चू कडू काय म्हणाले?

आज संध्याकाळी सात वाजता बच्चू कडू हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर चर्चा करणार आहेत. यापूर्वी आंदोलकांना सबोधित करताना कडू म्हणाले की, आंदोलनात काही गोष्टी भेटल्या नाहीत तरी काही गोष्टी फार मोठ्या उभ्या राहत असतात. एकदा ही वज्रमूठ उभी झाली की, यातून शेतकऱ्यांच्या आंदोलकांचं एक चांगलं भविष्य उभे राहिल अशी अपेक्षा आहे. माध्यमांनी हे आंदोलन महाराष्ट्रभर पोहचवलं, लोकांच्या मनापर्यंत नेलं. वरचा देव पावला आता खालचा देव पावतो का नाही हे आपल्याला खरंतर संध्याकाळी सात वाजता दिसणार आहोत. आंदोलनात आपण जिंकतो पण कधीकधी तहात हरत देखील असतो. एखादा निर्णय झाला तर चांगला निर्णयही कधीकधी विरोधात वाटत असतो, असं बऱ्याच आंदोलकांच्या बाबतीत आपण नेहमीच होताना पाहिलं आहे. पण आपण आंदोलन करतोय हे महत्त्वाचं आहे. निर्णय कमी जास्त होतातच. एखादा निर्णय सर्वच कार्यकर्त्यांना पटेल असे होत नाही. आंदोलनाबाबत प्रामाणिकपणा असणं महत्त्वाचं आहे, असे बच्चू कडू म्हणाले.

आपण यश घेऊनच येऊ, नाही यश भेटलं तर आंदोलन करायला आपल्याला कोणाच्याही परवानगीची आवश्यकता नाही, असेही बच्चू कडू म्हणाले.

11:35 (IST) 30 Oct 2025

Nagpur Farmers Protest : शेतकरी नेत्यांचा राज्यमंत्र्यांवर प्रश्नांचा भडीमार

राज्यमंत्र्यांना अधिकार काय? सरकारने त्यांना चर्चेला का पाठवले,असे एक नव्हे तर अनेक प्रश्न शेतकरी नेत्यांनी करून त्यांना भांडावून सोडले. …अधिक वाचा
11:30 (IST) 30 Oct 2025

‘पुनर्वापरातील पाणी वापर प्रकल्पा’ने टंचाईवर मात; पनवेल महापालिकेची दीर्घकालीन उपाययोजना

सध्या पनवेल महापालिका क्षेत्राला २५८ एमएलडी पाण्याची गरज असली तरी सुमारे २९ एमएलडी पाणी कमी पडत असल्याने नागरिकांना कमी दाबाने पाणीपुरवठा करावा लागतो. …सविस्तर बातमी
11:30 (IST) 30 Oct 2025

कळवा रुग्णालयात वाॅर्डचे नुतनीकरण पण, प्राणवायु वाहीनीचा पत्ताच नाही; प्राणवायु वाहीनी बसविण्यासाठी निविदा काढली नसल्याने…

ठाणे महापालिकेचे कळवा येथे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय आहे. सुमारे पाचशे खाटांचे हे रुग्णालय असून येथे ठाणे शहर तसेच आसपासच्या शहरासह ग्रामीण भागातील रुग्ण उपचारासाठी येतात. …सविस्तर वाचा
11:30 (IST) 30 Oct 2025

व्हिएतनाम येथील हिरव्या भाताची रायगडमध्ये लागवड…

पनवेल तालुक्यातील मिनेश गाडगीळ यांनी गेल्या वर्षी निळ्या आणि जांभळ्या रंगाच्या भात लागवडीचे प्रयोग यशस्वीपणे केले होते. त्यापुर्वी काळ्या आणि लाल रंगाच्या भात लागवडही त्यांनी यशस्वी करून दाखवली होती. …वाचा सविस्तर
11:30 (IST) 30 Oct 2025

तेजस एक्स्प्रेसमध्ये प्रवाशांना नाश्त्याऐवजी १० रुपयांचा बिस्कीट पुडा; ठेकेदाराकडून प्रवाशांची लूट

दिवाळी सणानंतर कोकणातून मुंबईत येण्यासाठी श्रेयस पटवर्धन यांनी शनिवारी तेजस एक्स्प्रेसचे आरक्षण केले. वेळापत्रकानुसार कुडाळ स्थानकात सायंकाळी ५ वाजता येणारी गाडी एक तास विलंबाने दाखल झाली. …सविस्तर बातमी
11:25 (IST) 30 Oct 2025

सुनियोजित शहरात इमारतींची अग्निसुरक्षा धोक्यात; दहा महिन्यांत आगीच्या ५९३ घटना

अग्निशमन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, शहरात दरमहा सरासरी ५० ते ६० आगीच्या घटनांची नोंद झाली आहे. या घटनांमागे शॉर्टसर्किट, गॅस गळती आणि इमारतींमधील निष्क्रिय अग्निसुरक्षा यंत्रणा ही प्रमुख कारणे असल्याचे अग्निशमन विभागाने स्पष्ट केले आहे. …सविस्तर वाचा
11:20 (IST) 30 Oct 2025

आपण ओबीसी नेत्यांना पत्र दिलं होतं – बच्चू कडू

आंदोलनाची सुरूवात करत असताना शेतकरी नेत्यांना एकत्रित आमंत्रित करून याची एक मोठ बांधण्याचा प्रयत्न केला. सर्व नेते एकत्र आले आणि कमी काळात आंदोलनाची तयारी आपण केली. आपण ओबीसी नेत्यांना पत्र दिलं होतं. प्रकाश आंबेडकरांना पत्र दिलं होतं. राजकीय पक्षांना देखील सगळ्यांना पत्र दिलं होतं. काँग्रेसने आपल्याला जाहीर पाठिंबा दिली, शरद पवारांच्या राष्ट्रवादीने देखील पाठिंबा दिला, असे बच्चू कडू यांनी सांगितले.

10:55 (IST) 30 Oct 2025

Naxalism in India : सविस्तर : नक्षलवाद्यांच्या पतनाचा प्रवास; चळवळीचे कुठे चुकले?

Fall of Naxal Movement India : काळानुरूप बदल न करता अंगी बाळगलेला पोथीनिष्ठपणा या पतनासाठी कारणीभूत ठरला का यावर आता चर्चा सुरू झाली आहे. …वाचा सविस्तर
10:44 (IST) 30 Oct 2025

Bacchu Kadu Maha Elgar Protest Nagpur : पावसात भिजले आंदोलनस्थळ; पण नाही ढळला शेतकऱ्यांचा निर्धार

Bacchu Kadu : रात्री उशिरा घडलेल्या वेगवान घडामोडींमध्ये बच्चू कडू यांनी चर्चेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला मुंबईला जाण्याचे मान्य केले. …सविस्तर वाचा
10:37 (IST) 30 Oct 2025

धाराशिवच्या राजकीय पटावर महायुतीतील भाजप, शिवसेनेत वादाची तिसरी घंटा

नगरपालिका व जिल्हा परिषदा निवडणुकीपूर्वी सत्ताधाऱ्यांमधील वाद चव्हाट्यावर आल्याने धाराशिवच्या भाजपच्या मंडळीमध्ये अस्वस्थता आहे. …सविस्तर वाचा
10:26 (IST) 30 Oct 2025

Nagpur Farmers Protest : रात्री आंदोलन स्थळी काय घडले ?

Bacchu Kadu Maha Elgar Protest : उंचसखल जमीन, काळोखात आंदोलकांनी उघड्यावर रात्र काढली. …सविस्तर बातमी
10:19 (IST) 30 Oct 2025

Special Trains : विशेष रेल्वे गाड्यांचा उद्यापासून परतीचा प्रवास… भुसावळ स्थानकावर केव्हा पोहोचणार ?

सण-उत्सव आटोपल्यानंतर आता त्या सर्व गाड्या शुक्रवारी परतीच्या प्रवासाला सुरूवात करणार आहेत. …अधिक वाचा
10:15 (IST) 30 Oct 2025

Bacchu Kadu Farmers Protest Nagpur : आंदोलन सुरूच ठेवून मुख्यमंत्र्यांशी आज चर्चा; तोडगा न निघाल्यास ‘रेल्वे रोको’

Nagpur Farmers Protest Latest News: मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत कर्जमाफीची तारीख जाहीर न केल्यास ३१ ऑक्टोबरला ‘रेल्वे रोको’ आंदोलन करण्याचा इशारा बच्चू कडू यांनी दिला. …अधिक वाचा
10:14 (IST) 30 Oct 2025

बंजारा समाजाचा एसटी आरक्षणासाठी रास्ता रोको! समृद्धी महामार्गावर सुमारे ८०० पोलीस तैनात

वाशिम जिल्ह्याच्या मालेगाव येथे आज बंजारा समाजाकडून एसटी आरक्षणाच्या मागणीसाठी रास्ता रोको करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून समृद्धी महामार्गावर सुमारे ८०० पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.