Mumbai News Live Today : सोमवारी महाविकास आघाडीची ‘वज्रमूठ’ सभा वांद्रे-कुर्ला येथील संकुलात पार पडली. या सभेत बोलताना उद्धव ठाकरे, अजित पवार आणि नाना पटोलेंसह महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भाजपा-शिंदे गटावर सडकून टीका केली. तसेच त्यांनी केंद्रातील भाजपा सरकारलाही लक्ष्य केलं. दरम्यान, ‘वज्रमूठ’ सभेत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केलेल्या टीकेला आता भाजपाच्या नेत्यांकडून प्रत्युत्तर देण्यात येत आहे. हा विषय आज दिवसभर चर्चेत राहण्याची शक्यता आहे.
Maharashtra Live News Update Today : मुंबईच्या जिल्हाधिकाऱ्यांना अवमान नोटीस; विकासकावरील कारवाईत निष्क्रियता दाखविल्याने उच्च न्यायालयाकडून कारवाई
मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होत आहे. कुठं थांबायचं हे मला माहिती आहे. त्यासाठी मी जयंत पाटील आणि प्रफुल्ल पटेल यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची लवकरच बैठक बोलवणार असल्याचंही ते म्हणाले.
पुणे: जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या नावाने बनावट फेसबुक अकाउंट काढण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
सोमवारी वज्रमूठ सभेत बोलताना उद्धव ठाकरेंनी भाजपावर चांगलेच तोंडसुख घेतले. यावेळी त्यांच्या चंद्रकांत पाटीलांनी बाळासाहेब ठाकरे आणि बाबरी मशीदीबाबात केलेल्या विधानाचाही चांगलाच समाचार घेतला. बाबरी मशीद पाडली तेव्हा, कशी पळापळ झाली होती. हे सर्वांनाच माहिती आहे. त्यांनी चंद्रकांतदादा आणि भाजपवाले कुठे होते? अशी टीका त्यांनी केली. दरम्यान, या टीकेला आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. गडचिरोलीत माध्यमांशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.
अमरावती : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने सहकार क्षेत्रात दमदार पदार्पण करण्याची महत्वाकांक्षा बाळगून असलेल्या आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांच्या गटाचा भ्रमाचा भोपळा फुटल्याने जिल्ह्याच्या राजकारणातील बदलत्या प्रवाहाचे संकेत मिळू लागले आहेत.
सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर, अकलूज, अक्कलकोट, दुधनी आणि मंगळवेढा या पाच कृषिउत्पन्न बाजार समित्यांमध्ये भाजपने वर्चस्व मिळवून आगामी विधानसभा निवडणुकांची यशस्वीपणे साखर पेरणी केली.
शरद पवारांच्या 'लोक माझे सांगाती' या राजकीय आत्मचरित्रपर पुस्तकाचं प्रकाशन आज होत आहे. मुंबईतील वाय.बी सेंटरमध्ये हा प्रकाशन सोहळा सुरू आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेससह विविध राजकीय पक्षांचे नेतेही उपस्थित आहेत.
यवतमाळ : शहरालगत कोळंबी जंगलात दोन युवकांच्या हत्येची घटना उजेडात आली. यवतमाळ शहरातील रहिवासी असलेल्या दोन्ही युवकांचा सोमवारी रात्रीच्या सुमारास खून करून मृतदेह रस्त्याच्या कडेला फेकून देण्यात आले. या दुहेरी हत्याकांडाने शहरात खळबळ उडाली आहे.
डोंबिवली – कल्याण, डोंबिवली शहराच्या काही भागांत मंगळवारी सकाळी जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसाने कामावर निघालेल्या नागरिकांची तारांबळ उडवली. बाजारपेठांमध्ये दुकाने लावण्याच्या गडबडीत असलेल्या व्यापाऱ्यांची पळापळ झाली.
महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा बीकेसीच्या सर्वात लहान कोपऱ्यात सभा झाली. कालच्या सभेत ८० टक्के लोक अल्पसंख्याक समाजाची होती. काही दिवसांत महाविकास आघाडीवर मंगल कार्यालयात सभा घेण्याची वेळ येईल, अशी टीका नितेश राणे यांनी केली.
“कळमनुरीत राष्ट्रवादी, उरलेली शिवसेना, काँग्रेस, वंचित हे सगळे एक झाले आहेत. पण आजही सांगतो, नागनाथाचं मंदिर समोर आहे. १७ पैकी १७ जागा जर निवडून नाही आल्या, तर हा संतोष बांगर या मिशा ठेवणार नाही”, असं आव्हानच संतोष बांगर यांनी दिलं होतं. मात्र, कळमनुरीत महाविकास आघाडीचा विजय झाल्यानंतर संजय राऊतांनी बांगरांना टोला लगावला आहे. आता मिशा काढा, नाही तर हजामत करायला पाठवतो, असे ते म्हणाले.
नागपूर : ढगांच्या गडगडाटासह विदर्भात आज पुन्हा एकदा मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. येत्या पाच मे पर्यंत हा पाऊस कायम राहील.
वर्धा : विदर्भात मुक्कामी असताना रस्त्यानेच कारचा प्रवास करीत अन्य जिल्ह्यात मंत्री जात असल्याचे नेहमीचे चित्र. शिवाय बहुतांश जिल्हे गुळगुळीत रस्त्याने जोडल्या गेले असल्याने हा प्रवासही सुसह्य झाल्याची सार्वत्रिक भावना आहे. मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अवघ्या दीड तासांच्या वर्धा दौऱ्यावर थेट हेलिकॉप्टरने आज येत आहेत.
नागपूर : ढगांच्या गडगडाटासह विदर्भात आज पुन्हा एकदा मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. येत्या पाच मे पर्यंत हा पाऊस कायम राहील.
सोमवारी महाराष्ट्र दिनी (१ मे) मुंबईतील बीकेसी मैदानावर महाविकास आघाडीची ‘वज्रमूठ’ सभा पार पडली. या सभेतून ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीच्या इतर नेत्यांनी शिंदे गटासह भाजपावर सडकून टीका केली. यावेळी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपा नेते आशिष शेलारांवर जोरदार हल्लाबोल चढवला.
सोमवारी महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजपा-शिंदे गटावर सडकून टीका केली होती. भारतीय जनता पक्ष मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा प्रयत्न करत असून शिंदे गट हे निमूटपणे बघत आहे, असे ते म्हणाले होते. दरम्यान, या टीकेला भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. त्यांनी ट्वीट करत यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.
माहीममधील एका विकासकाच्या मालकीच्या सदनिका जप्त करण्याच्या आदेशाचे मुंबईचे जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांनी जाणीवपूर्वक उल्लंघन केल्याचे निरीक्षण नोंदवून उच्च न्यायालयाने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तसेच आदेशाचा अवमान केल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई का करू नये, अशी विचारणा केली आहे.