Maharashtra News Highlights: मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झालं आहे. अशा स्थितीत केंद्र सरकारने महाराष्ट्राला मदत करावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज (२६ सप्टेंबर) दिल्ली दरबारी दाखल झाले आहेत. तसेच काल त्यांनी मुंबईत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना मदतीसंदर्भात निवेदन दिलं आहे. महापुराने बेहाल झालेल्या मराठवाड्याला मदतीचा हात देणं गरजेचं असून राज्य सरकारच्या तिजोरीत निधी नसला तरी उणे अर्थसंकल्पातून तरतुदी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. नुकसानीचे पंचनामे झाल्यानंतर मदत दिली जाईल, असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.
Marathi News Live Today : राज्यासह देशभरातील बातम्या वाचा एकाच क्लिकवर.
Attempted Murder : बाणेरमध्ये वैमनस्यातून टोळक्याकडून दोघांवर हल्ला; मारहाणीत एक युवक गंभीर जखमी
प्रांजल खेवलकरला जामीन… एकनाथ खडसेंची पहिली प्रतिक्रिया, “हा राजकारणाचा डाव…”
नंदुरबारमधील आदिवासी समाजाचा उद्रेक… निमित्त एक, कारणे अनेक
Competitive Exam Postpone: राज्यस्तरीय ऑनलाईन स्पर्धा परीक्षा पुढे ढकलल्या! वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्र्यांचा आदेश
मिरा-भाईंदरमध्ये मोकाट जनावरांवर ३ हजारांचा दंड; महापालिकेचा निर्णय
“मी वेगळ्या उद्देशाने तसं बोललो”, अजित पवारांचं ‘त्या’ वक्तव्यावर स्पष्टीकरण
धाराशिवमधील पूरग्रस्तांना धीर देताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले होते की “आपल्याला सगळी सोंगं आणता येतात. परंतु, पैशाचं सोंग आणता येत नाही.” यावरून त्यांच्यावर बरीच टीका झाली. या टीकेला आता त्यांनी उत्तर दिलं आहे. ते म्हणाले, “मी ग्रामीण भागात जातो तेव्हा तिथल्या लोकांना समजेल अशा भाषेत बोलत असतो. आपल्या घरी बोलली जाते तशीच भाषा वापरतो. आपण आपल्या घरातही बोलतो की ‘अरे बाबा आपल्याला सगळी सोंगं आणता येतात, परंतु पैशाची सोंगं घेता येत नाहीत.’ काही गोष्टी बजेटमध्ये बसवाव्या लागतात. तशा अर्थाने मी बोललो. परंतु, विरोधक चुकीचा अर्थ घेत आहेत. मी आधी काय बोललो, नंतर काय बोललो ते ऐकतच नाहीत. मधलं वाक्य तेवढं घेतलं आणि टीका केली.”