Marathwada Rain News Highlights: मराठवाड्यासह सोलापूर, अहिल्यानगर, जळगाव आणि नाशिक जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. सर्वाधिक फटका मराठवाड्यातील जिल्ह्यांना बसला आहे. सरकारने शेतकऱ्यांच्या मदतीसाठी २,२१५ कोटींची मदत जाहीर केली आहे. तसेच प्रचलित निकषांमध्ये शिथिलता आणून शेतकऱ्यांना मदत दिली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी केली.
नुकसान किती झाले याची पाहणी करणे आणि शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आज (बुधवारी) मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि इतर मंत्री विविध जिल्ह्यांचा दौरा करणार आहेत.
Live Updates
Marathi News Live Today | महाराष्ट्र न्यूज लाईव्ह अपडेट्स
कोंढव्यात आर्थिक वादातून शाळकरी मुलावर शस्त्राने वार; दाम्पत्य गजाआड
सोमवारी (२२ सप्टेंबर) रात्री पावणेदहाच्या सुमारास आरोपी शाहरुख आणि त्याची पत्नी मरियम हे त्याच्या घरी गेले आणि शिवीगाळ केली. त्यावेळी आरोपींनी अल्पवयीन मुलाच्या आईला मारहाण केली. तेव्हा अल्पवयीन मुलाने मध्यस्थी केली. …सविस्तर बातमी
ठेकेदाराच्या तीन वर्षांच्या मुलीचे अपहरण; कल्याण रेल्वे स्थानकातून मुलीची सुखरूप सुटका
प्रिन्स पाल (वय २५), ओमनारायण पाल (वय २४, सध्या रा. शुभ निर्मल, सिंबायोसिस लॉ कॉलेजजवळ, विमाननगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. …सविस्तर बातमी
श्री अष्टभुजा दुर्गादेवी
विविध समाजघटकांना एकत्रित बांधून ठेवण्यासाठी सण आणि उत्सव उपयुक्त ठरतात. देवीचा नवरात्रोत्सव लोकांना एकत्रित आणण्यास साहाय्यभूत ठरतो. विविध समाजांमध्ये साजऱ्या केल्या जाणाऱ्या अशा नवरात्रोत्सवांची माहिती देणारी मालिका… …सविस्तर वाचा
पुण्यातील कात्रज प्राणिसंग्रहालयात इतके प्राणी ! आयुक्तांनीच दिली कबुली
महापालिका आयुक्त राम यांनी महापालिकेच्या कात्रज येथील राजीव गांधी प्राणी संग्रहालयाला भेट देऊन तेथील सोयी-सुविधांची पाहणी केली. या पाहणीमध्ये आयुक्तांना येथे अनेक त्रुटी जाणवल्या. …सविस्तर बातमी
बारामतीत भगरीच्या पिठातून विषबाधा; चार महिलांवर उपचार सुरू
झारगडवाडीतही काही कुटुंबांनी किराणा दुकानातून आणलेल्या भगरीच्या पिठापासून भाकऱ्या केल्या. मात्र त्या खाल्ल्यानंतर काही महिलांना अचानक उलटी, मळमळ व अशक्तपणा जाणवू लागला. …सविस्तर बातमी
सिंधुदुर्ग: ओबीसी समाजाचे कुडाळमध्ये लाक्षणिक उपोषण; ‘हैदराबाद गॅझेट’ रद्द करण्याची मागणी
आंदोलनाची सुरुवात कुडाळ येथील राजमाता जिजाऊंच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून झाली. मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देऊ नये, ही या आंदोलनाची मुख्य मागणी आहे. …सविस्तर वाचा
सिंधुदुर्ग जिल्हा मुख्यालयात खड्ड्यांमुळे अपघात, महिला सरकारी अधिकाऱ्याचा मृत्यू; जबाबदारी कोण घेणार?
हेमलता कुडाळकर या जिल्हा परिषदेच्या लेखा आणि कोषागार कार्यालयात काम करत होत्या. पतपेढीतील काम आटोपून त्या दुचाकीवरून परत येत असताना हा अपघात झाला. …अधिक वाचा
नवरात्रोत्सवातील यात्रेत तोतया जवान; म्हणे मी उत्तराखंडच्या बटालियनमधील; निघाला गोंधळी
छत्रपती संभाजीनगर येथील कर्णपुरा देवीच्या परिसरात नवरात्रोत्सवानिमित्त भरलेल्या यात्रेत एक २१ वर्षाचा तरूण सैन्य दलातील जवानासारखा पोशाख, बुट व टोपी घालून फिरताना मंगळवारी सायंकाळी उघडकीस आले. …वाचा सविस्तर
राष्ट्रीय सेवा योजनेचा देशभरात विस्तार, किती स्वयंसेवक वाढवणार?
देशभरात ‘एनएसएस’चे सुमारे ३९ लाख स्वयंसेवक कार्यरत आहेत. क्रीडा व युवा व्यवहार मंत्रालयाकडून २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात एनएसएस स्वयंसेवकांची संख्या आणखी २५ लाखांनी वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. …अधिक वाचा
“आमचा निर्णय झालाय”, शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईबाबत अजित पवारांचं वक्तव्य; म्हणाले, “ज्यांची जमीन खरडून गेलीय…”
Ajit Pawar on Flood Relief : अजित पवार म्हणाले, “मी हे सगळं पाहायला इथे आलो आहे. पाणी ओसरू द्या, किती रान वाहून गेलं आहे ते पाहू द्या, सगळ्याचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत केली जाईल.” …अधिक वाचा
अजित पवार सध्या पूरग्रस्त गावांना भेटी देत आहेत. (PC : Ajit Pawar/FB)