Maharashtra Politics Updates : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज (१७ सप्टेंबर २०२५) ७५ वा वाढदिवस असून या निमित्ताने देशासह जगभरातून पंतप्रधान मोदींना शुभेच्छा देण्यात येत आहेत. राज्यातील नेत्यांकडून देखील पंतप्रधान मोदींना शुभेच्छा दिल्या आहेत. याबरोबरच राज्यातील राजकारणात महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वातावरण तापण्यास सुरूवात झाली आहे. काल मुंबईत भाजपाच्या विजय संकल्प मेळाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. यानंतर आज ठाकरेंच्या शिवसेनेकडून काय प्रतिक्रिया येतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तसेच राज्यातील काही भागांत पावसाचा जोर कायम आहे. पुढील दोन दिवस राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या सर्व घडामोडींचा आढावा आपण या लाईव्ह अपडेट्सच्या माध्यमातून घेणार आहोत.
Mumbai Pune Marathi News Live Today : राज्यातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर…..
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्यांना तातडीने मदत केली जाईल – पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर
तुमच्या मुलाला उलट्या, जुलाब होताहेत? हे असू शकतं कारण…
मीनाताई ठाकरे पुतळ्याची विटंबना; शिवसैनिकांचा संताप उसळला, पोलिसांची तीन विशेष पथके चौकशीसाठी सज्ज
अपंगत्व मर्यादा नसून नवी संधी – चंद्रकांत पाटील
नंदुरबार पोलीस ठाण्याबाहेर टोळक्याचा… हद्दपार आरोपीचा शहरातच वावर
नांदेडमध्ये महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांकडून मीनाताई ठाकरेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक
मुंबई येथे मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकल्यानंतर याचे पडसाद आता महाराष्ट्रभर उमटताना पाहायला मिळत आहेत. नांदेडमध्ये महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्रित आक्रमक भूमिका घेतली आहे. मीनाताई ठाकरे यांच्या प्रतिमेला दुग्ध अभिषेक घालून जोरदार घोषणाबाजी केली आहे. सरकारने समाजकंटकावर त्वरित कारवाई केली पाहिजे अन्यथा दोन दिवसात आरोपीला अटक नाही केलं तर नांदेड बंद करू अशी आक्रमक भूमिका शिवसैनिकांनी घेतली आहे.
Sharad Pawar On Maratha OBS Reservation : मराठा-ओबीसी आरक्षणाबाबत शरद पवारांचे महत्त्वाचे वक्तव्य; म्हणाले, “राज्य सरकार पावले टाकतंय पण…”
उपसा जलसिंचन योजनांना जुन्या वीज दराबद्दल ‘लोकनेते देसाई कारखान्या’च्या सभेत सरकारचा गौरव
मेट्रो २ ब : डायमंड गार्डन – मंडाले टप्पा प्रवाशांसाठी सज्ज, ३० सप्टेंबरला मोदींच्या हस्ते उद्घाटन?
भाड्याची सरकारी घरे पाच वर्षांनंतर मालकीची ?
ट्रक बंद पडल्यामुळे माणिकपूर रस्त्यावर वाहतूक कोंडी
कोळी समाजालाही निवडणुकीत स्वतंत्र आरक्षण हवे!
दादा भुसे यांना आव्हान देणारे बंडूकाका बच्छाव आता…राष्ट्रवादी शरद पवार गटाचा थेट प्रस्ताव
मुंबई को उडा देंगे… अंधेरीतील हॉटेलला धमकीचा दूरध्वनी
कौतुकास्पद! ‘फॅशन शो’च्या निमित्ताने शाळकरी मुलींना सॅनिटरी पॅडचे वाटप
पिंपरी- चिंचवड: कशिश सोशल फाउंडेशन महिलांसाठी विविध उपक्रम राबवत असते, यामध्ये दुर्गम, झोपडपट्टी भागातील महिलामध्ये मासिक पाळी जनजागृती, सॅनिटरी पॅड वाटप सातत्याने केले जाते. रायझिंग स्टार आणि मिस, मिस्टर, मिसेस इंडिया ग्लोबल फॅशन शोच्या निमित्ताने शहरातील शाळकरी मुलींना सॅनिटरी पॅड वाटप करण्यात आले. एलप्रो मॉल, चिंचवड येथे कशिश सोशल फाउंडेशनच्या सहकार्याने कशिश प्रॉडक्शन्सच्या वत्तीने रायझिंग स्टार मिस, मिसेस, मिस्टर २०२५ या फॅशन शोचे आयोजन केले होते. हा फॅशन शो संपन्न झाला. यामध्ये शंभराहून अधिक स्पर्धक सहभागी झाले होते.
शेतकरी भवन योजनेस दोन वर्षांची मुदतवाढ
मुंबईत पावसाची दमदार नोंद; १६ सप्टेंबरपर्यंत ५५७९.८ मिमी पाऊस
ठेवीदारांचा वाढता रोष पाहूनच ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटेंच्या अटकेची प्रक्रिया गतिमान
Vishwas Patil: ‘पानिपत’कारांवर साहित्य चौर्याचा आरोप; संमेलनाध्यक्षपदावरील निवड रद्द करण्याची मागणी
महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरण : चमणकर बंधूंविरुद्धचा आर्थिक गैरव्यवहराचा खटला रद्द
पुणेकरांसाठी महत्वाची बातमी : गुरुवारी पाणीपुरवठा राहणार बंद, तुमच्या भागात काय होणार !
Devendra Fadnavis: “आम्ही केलेल्या घोषणा कागदावर राहणार नाहीत”, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दावा
Live : मोदींच्या वाढदिवशी ठाकरे गटाने वाटले गाजर अन् पेढे; पाहा Video
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज ७५ वा वाढदिवस आहे. यानिमित्ताने देश आणि जगभरातील नेते त्यांना शुभेच्छा देत आहेत. यादरम्यान पुण्यात शिवसेना (ठाकरे) पक्षाने मोदींचा अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवला आहे. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पुण्यात मोदींच्या वाढदिवसानिमीत्त पेढे आणि गाजर वाटले आहेत.
