Marathi News Updates: महाराष्ट्र विधिमंडळ अधिवेशनाच्या निमित्ताने सत्ताधारी व विरोधकांमध्ये विविध मुद्द्यांवरून खडाजंगी पाहायला मिळत आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात नुकताच अजित पवारांनी ११व्यांदा अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्पातील तरतुदींवर सध्या विरोधकांकडून सरकारला घेरलं जात असताना बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरण व त्यानिमित्ताने थेट धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यापर्यंत पोहोचलेलं राजकीय प्रकरण यावरही सध्या जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे.

Live Updates

Maharashtra News Live Today, 12 March 2025 : महाराष्ट्र विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनातील महत्त्वाच्या घडामोडी…

12:10 (IST) 12 Mar 2025

अर्थसंकल्पात चंद्रपूरला भोपळा, पालकमंत्र्यांसह भाजपच्या पाच आमदारांचे अपयश!

चंद्रपूर : सुधीर मुनगंटीवार पालकमंत्री असताना सलग साडेसात वर्षे जिल्ह्याला कोट्यवधींचा निधी मिळाला. यंदाच्या अर्थसंकल्पात मात्र जिल्ह्याला एक नवा पैसा देण्यात आलेला नाही. चंद्रपूरसाठी एकही नवी योजना वा प्रकल्पाची घोषणा नाही. हे पालकमंत्र्यांसह जिल्ह्यातील भाजपच्या पाचही आमदारांचे अपयश असल्याची चर्चा जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.

सविस्तर वाचा…

12:04 (IST) 12 Mar 2025
Rohit Pawar Latur Viral Video: रोहित पवारांनी लातूरमधील मारहाणीचा व्हिडीओ केला शेअर…

भर रस्त्यात निपचित उघडी~नागडी पडलेली महाराष्ट्राची कायदा व सुव्यवस्था मंत्रालयातील कोटवाल्यांना दिसेल का? आणि राज्यातील गुन्हेगारीच्या भस्मासुराचा वध होऊन सामान्य माणसाचं जगणं निर्भय होईल का? पोलिसांनी गुन्हेगारांची धिंड काढली, तेवढाच दिलासा…! – रोहित पवार

10:48 (IST) 12 Mar 2025

Satish Bhosle Arrested: खोक्या उर्फ सतीश भोसलेला प्रयागराजमधून अटक

भाजपा आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता खोक्या उर्फ सतीश भोसले याचा दीड वर्षापूर्वी एका व्यक्तीला अमानुष मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर सतीश भोसले परागंदा झाला होता. अखेर आज प्रयागराज पोलीस व बीड पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई करत सतीश भोसलेला प्रयागराज येथून अटक केली आहे. गेल्या आठवड्याभरापासून सतीश भोसले फरार होता. तो चॅनल्सवर प्रतिक्रिया देतानाचे व्हिडीओ समोर आल्यानंतर न्यायालयानेदेखील पोलिसांना फटकारलं होतं.

10:46 (IST) 12 Mar 2025

Rohit Pawar on Suresh Dhas: रोहित पवारांची भाजपातील अंतर्गत राजकारणावर खोचक टिप्पणी!

कदाचित भाजपाचाच एक मोठा नेता जो आज या सरकारमध्ये मोठ्या पदावर आहे, त्यांनीच धसांना मुंडेंविरोधात ताकद दिली होती का हे आपल्याला बघावं लागेल. पंकजाताईंना काय म्हणायचं होतं हे सांगता येणार नाही. आत्तापर्यंत शिंदेंचे लोक भाजपाशी भिडत होते. अजित पवारांचे लोक भाजपा किंवा शिंदेंच्या आमदारांशी भिडत होते. आता भाजपातच आमदार एकमेकांशी भिडायला लागले आहेत. तीन महिन्यांत ही स्थिती असेल, तर वर्षभरात काय होईल. दोन वर्षांत काय होईल. चार वर्षांत तर या सरकारमध्ये काय होईल हे मला माहिती नाही. फक्त कृपा करून आपण अशी अपेक्षा ठेवू की हे आमदार एकमेकांचे कपडे फाडणार नाहीत – रोहित पवार

संदर्भ – बीडमध्ये सुरेश धस व धनंजय मुंडे यांच्यातील वादामध्ये भाजपात अंतर्गत मतभेद असल्याचं चित्र निर्माण झालं आहे. त्यावरून रोहित पवार यांनी टीका केली आहे.

आष्टीचे आमदार सुरेश धस

Maharashtra News Live Today, 12 March 2025 : संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून सध्या बीडमधील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.