Maharashtra Breaking News Updates : सामजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर पुन्हा गंभीर आरोप केले आहेत. मंत्रिमंडळाचा निर्णय झाल्याचे भासवून निधी मंजूरीचा जीआर काढल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे. मात्र हे आरोप धनंजय मुंडे यांनी फेटाळून लावले असून न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे. याबरोबरच राजन साळवी यांनी पक्ष सोडल्यानंतर उद्धव ठाकरे हे आज त्यांच्या पक्षाच्या आमदारांची बैठक घेणार आहेत. या बैठकीत नेमकी कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होते हे पाहाणे महत्त्वाचे ठरणार आहे. याबरोबरच राज्यात मुंबई आणि पुणे येथे गुइलेन बॅरे सिंड्रोमच्या (जीबीएस)च्या रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. यासह राज्यातील वेगवेगळ्या राजकीय घडामोडींच्या अपडेट आपण येथे पाहाणार आहोत.
Maharashtra News Live Update Today, 20 February 2025 : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर
ठाणे शहरात जलमापके चोरण्याचे प्रकार सुरूच, गेल्या सात वर्षात ३१५५ जलमापकांची चोरी
ठाणे महापालिका प्रशासनाने शहरातील नळजोडण्यांवर बसविलेले जलमापके चोरून नेण्याचे प्रकार सुरूच असल्याची माहिती पुढे आली आहे. गेल्या सात वर्षांमध्ये ३ हजार १५५ जलमापकांची चोरी झाली आहे.
पुण्यात ‘जीबीएस’मुळे आणखी दोघांचा बळी; रुग्णसंख्या २११ वर
ससून सर्वोपचार रुग्णालयात ३७ वर्षीय पुरुषाचा जीबीएसमुळे मृत्यू झाला आहे. तो सोनवडी (ता. दौंड) येथील रहिवासी होता.
पुणे : जीबीएसचे रुग्ण आढळलेल्या गावांमध्ये महापालिकेने केला ‘या’साठी खर्च !
सिंहगड रस्त्यावरील नांदोशी, खडकवासला, डीएसके विश्व यासह किरकिटवाडी या भागात गुइलेन बॅरे सिंड्रोमच्या (जीबीएस) संशयित रुग्णांची संख्या वाढत असल्याचे समोर आले आहे.
स्वारगेट – कात्रज मेट्रो प्रकल्पाला होणार उशीर ? ‘हे’ आहे कारण…
पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट हा मेट्रो मार्ग सुरू करण्यात आला आहे. त्यानंतर हाच मार्ग पुढे कात्रजपर्यंत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
रोजगार हमी योजनेतील रोजंदारी वाढवणार – गोगावले
राहुल गांधी यांनी शिवजयंतीनिमित्त त्यांना ‘श्रद्धांजली’ वाहिली असल्याचे विचारताच गोगावले यांनी त्यांच्यावर सडकून टीका केली.
संकेतस्थळावर बनला गुन्हे शाखेचा तोतया अधिकारी, १२ तरुणींवर लैंगिक अत्याचार
लग्न जुळविण्यासाठी मुली शादी डॉट कॉम या संकेतस्थळावर आपले नाव नोंदवतात. त्याचाच फायदा अहमदाबाद येथे राहणारा ठकसेन हिमांशू पांचाळ याने उठवला.
राज्यातील १२ किल्ल्यांची जागतिक वारसास्थळात नोंदीसाठी प्रयत्न, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त ‘जय शिवाजी जय भारत’ पदयात्रेचे बुधवारी आयोजन करण्यात आले.
उन्हाळ्याची चाहूल, लिंबांच्या दरात वाढ
उन्हाचा चटका वाढल्याने घरगुती ग्राहकांसह, रसवंतिगृहचालक सरबत विक्रेत्यांकडून लिंबांच्या मागणीत वाढ झाली आहे.
‘मनोधैर्य योजने’चा पीडितांना आधार, विधी सेवा प्राधिकरणाचा पाठपुरावा; नऊ कोटी १३ लाखांची मदत
अत्याचाराला बळी पडलेल्या महिलेच्या मानसिक आरोग्य, तसेच भावनिक सुरक्षिततेवर परिणाम होतो. अशा घटनांमध्ये पीडित महिला कोलमडून पडतात.
छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श युवकांनी घ्यावा – हर्षवर्धन पाटील
बावडा येथे शिवाजी एज्युकेशन संस्थेच्या प्रांगणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास शिवजयंतीनिमित्त हर्षवर्धन पाटील यांनी बुधवारी पुष्पहार अर्पण करून पूजा व आरती केली. या प्रसंगी ते बोलत होते.
पिंपरी : कुदळवाडीतील आरक्षणे विकसित करण्याचा मार्ग मोकळा; ‘या’ सुविधा निर्माण होणार
चिखली, कुदळवाडी, जाधववाडी भागाचा पायाभूत विकास साधण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने सन १९९६-९७ च्या विकास आराखड्यामध्ये आरक्षणे निश्चित केली आहेत.
पिंपरी : सांगवीत उद्यापासून पवनाथडी जत्रा; खाद्यदार्थासह विविध ७५० स्टॉल
महापालिकेच्या समाजविकास विभागामार्फत दर वर्षी पवनाथडी जत्रा आयोजित केली जाते. त्याला शहरातून विक्रमी प्रतिसाद मिळतो.
अखेर हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो या महिन्यात सुरू होणार, तोपर्यंत वाहतूक कोंडीतूनच प्रवास
हिंजवडी ते शिवाजीनगर या २३.३ किलोमीटर लांबीच्या मेट्रो प्रकल्पाचे ८२ टक्के काम पूर्ण झाले आहे.
दापोली : खेडमध्ये वाहनांसह ३१ हजार रुपये किंमतीचा गांजा पकडला; तिघांवर गुन्हा
खेड तालुक्यातील खोपी फाटा येथील रघुवीर घाट फाटा नजीक ३१ हजार रुपये किंमतीचा २ किलो गांजा विक्रीसाठी नेत असताना पोलिसांनी सापळा लावून आरोपींना पकडले.
Video : दापोडीत वाहनांची तोडफोड करणाऱ्या गुंडांची काढली धिंड!
हवेत कोयते फिरवून दहशत निर्माण करणाऱ्या आणि रिक्षांची तोडफोड करणाऱ्या गुंडांची दापोडी पोलिसांनी भर वस्तीमधून धिंड काढली आहे.
पिंपरी : पिस्तुल, कोयता बाळगणारे दोघे अटकेत; सात काडतुसे जप्त
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तळेगाव दाभाडे येथील जुना जकात नाका येथे अभिषेक पिस्तुल घेऊन आल्याची माहिती मिळाली.
मध्यरात्री भूगर्भातील गूढ आवाज अन् धक्के, गावकऱ्यांची उडाली झोप, जाणून घ्या कुठला आहे प्रकार…
कालची रात्र भीतीच्या सावटात बसून काढली आहे. त्यामुळे या प्रकारांचा लवकरात लवकर शोध लावा अशी विनंती गावकऱ्यांनी प्रशासनाला केली आहे.
निवडणूक संपताच रेल्वेचे घूमजाव, वसईकरांना ४ नव्हे फक्त २ रेल्वे उड्डाणपूल मिळणार
वसई विरार शहराचे क्षेत्रफळ ३८० चौरस किलोमीटर असून शहराची लोकसंख्या २५ लाखांच्या घरात गेली आहे. शहरातील रस्ते अरूंद असून त्यावर वाहनांची संख्या वाढत आहे.
भविष्यात एमएमआरमध्ये १५ हजारांत ४०० चौ. फुटांचे भाड्याचे घर, एकूण गृहनिर्मितीच्या ३० ते ४० टक्के भाड्याच्या घराची निर्मिती
एमएमआरचा आंतरराष्ट्रीय आर्थिक विकास केंद्र अर्थात ग्रोथ हब म्हणून विकास केला जाणार आहे. त्यानुसार ग्रोथ हबची संपूर्ण जबाबदारी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणावर (एमएमआरडीए) सोपविण्यात आली आहे.
राजन साळवींनी पक्ष सोडल्यानंतर उद्धव ठाकरे आज घेणार आमदारांची बैठक
कोकणातील राजापूरचे माजी आमदार राजन साळवी यांच्यासह प्रमुख कार्यकर्त्यांनी पक्ष सोडल्यानंतर, शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज पक्षाच्या आमदारांची बैठक घेणार आहेत. राज्य विधानसभेतील पक्षनेते निवडण्याबाबतही चर्चा होण्याची शक्यता आहे. तर २५ फेब्रुवारी रोजी खासदारांची बैठक होणार आहे.
दुबईला जाणाऱ्या बांगलादेश एअरलाइन्सच्या विमानाचे नागपूर विमानतळावर एमर्जन्सी लँडिंग
ढाकाहून दुबईला जाणाऱ्या विमान बांगलादेश ( Biman Bangladesh) एअरलाइन्सच्या विमानाचे नागपूर विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करावे लागण्याची घटना समोर आली आहे. याबद्दल प्रशासकिय अधिकाऱ्यांकडून माहिती देण्यात आली आहे.
महाराष्ट्र न्यूज लाईव्ह अपडेट्स
