Mumbai- Pune Rain Updates : नैऋत्य मोसमी पावसाचा परतीचा प्रवास अखेर राजस्थानमधून सुरू झाल्याचे भारतीय हवामान विभागाने रविवारी जाहीर केले आहे. यानंतर मुंबई, पुण्यासह राज्यातील विविध ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. मुंबई शहरात पावसामुळे अनेक ठिकाणी सखल भागांमध्ये पाणी साचल्याने वाहतूकीवर परिणाम झाला आणि जनजीवन विस्कळीत झाले. दरम्यान येत्या काही तासांत मुंबईत पावसाचा जोर अधिक वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या कालावधीत मेघगर्जनेसह पाऊस पडेल.

Live Updates

Mumbai Rain Update : राज्यातील पावसासंबंधीत आणि इतरही सर्व महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर

15:35 (IST) 15 Sep 2025

डोंबिवलीत वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या कमानी, १५० बेकायदा फलकांवर कारवाई

नियमबाह्य फलक, बेकायदा कमानी उभारण्यात आल्या तर त्या काढून टाकण्या येणार आहेत, असे साहाय्यक आयुक्त मुंबरकर यांनी सांगितले. …सविस्तर वाचा
15:21 (IST) 15 Sep 2025

नंदुरबार जिल्ह्यातील सिकलसेल…प्रशासनच अचूक आकडेवारीच्या शोधात

सिकलसेलची खरेदी केलेली औषधेही रुग्णांपर्यत पोहचत नसल्याच्या तक्रारी रुग्णांनी थेट आरोग्यमंत्र्यापुढे केल्याने सिकलसेलच्या नावाखाली होत असलेली करोडो रुपयांची औषध खरेदी कोणासाठी, असा प्रश्न उपस्थित होत आहे. …अधिक वाचा
15:13 (IST) 15 Sep 2025

सुप्रिया सुळे, रोहित पवारांनी तात्काळ राजीनामा द्यावा; नाशिक मेळाव्यानंतर भाजपकडून राजीनाम्याची मागणी का होत आहे?

राहुल गांधींनी केलेल्या आरोपांनंतर कथित मतचोरीचा मुद्दा चर्चेत आला. त्यावरून शरद पवारांची राष्ट्रवादीही मैदानात उतरल्याचं दिसून आले. …सविस्तर बातमी
15:00 (IST) 15 Sep 2025

Video: खांदेश्वर आणि मानसरोवर रेल्वे स्थानकात दिड फूट पाणी, पाय भिजवून रेल्वे स्थानक गाठण्याची शिक्षा

सततच्या पावसामुळे हार्बर मार्गावरील खांदेश्वर आणि मानसरोवर रेल्वेस्थानकाच्या तळमजल्यावर दिड फूट पाणी साचले. …वाचा सविस्तर
14:43 (IST) 15 Sep 2025

Pimpri Chinchwad Crime News: युवकाला इंद्रायणी नदीच्या पात्रात फेकले

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादीला मद्यपान करण्यासाठी बोलावले, रिक्षात बसवून त्याला मोशीत येथे नेले. …सविस्तर बातमी
14:41 (IST) 15 Sep 2025

विश्वास पाटलांची सरकारी सेवेतील कारकिर्द वादग्रस्त…

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी असताना विश्वास पाटील यांनी निवृत्तीला काही दिवस शिल्लक असताना असंख्य फाईली निकाली काढल्या होत्या. …अधिक वाचा
14:36 (IST) 15 Sep 2025

डॉक्टरच्या घरात सिनेमातला प्रसंग! ‘स्पेशल २६’ची नक्कल करून कोट्यवधींची लूट

प्राप्तीकर अधिकारी असल्याची बतावणी करत रोकडसह कोट्यवधीची लूट करण्याचा प्रकार कवठेमहांकाळमध्ये एका डॉक्टरांच्या घरी रविवारी रात्री घडला …वाचा सविस्तर
14:32 (IST) 15 Sep 2025

उल्हासनगर : लोकअदालत उपक्रमात वाहतूक पोलीसांचे विक्रमी यश

उल्हासनगरात एका दिवसात ५३० प्रकरणांवर कारवाई, तब्बल १८ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. …सविस्तर वाचा
14:27 (IST) 15 Sep 2025

Nanded Farmers Suicide: पावसाची टक्केवारी आणि शेतकरी आत्महत्यांचे शतक पूर्ण ! नांदेड जिल्ह्यातील ‘करुण आणि दारुण’ चित्र

अतिवृष्टीमुळे झालेली दाणादाण समोर आलेली असतानाच १ जानेवारीपासून ते १० सप्टेबरपर्यंत जिल्ह्यातील ११० शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. …सविस्तर वाचा
14:17 (IST) 15 Sep 2025

वसई : शहरात अमली पदार्थांची तस्करी सुरूच, ५० लाखांचा मेफेड्रोन जप्त; तीन जणांना अटक

नालासोपारा पूर्वेच्या सेंट्रल पार्क मैदानाजवळ ३ व्यक्ती अमली पदार्थ विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती गुन्हे प्रकटीकरण शाखा २ च्या पथकाला मिळाली होती. …सविस्तर वाचा
14:12 (IST) 15 Sep 2025

Today Gold Silver Rate : उच्चांकी दरवाढीनंतर…जळगावमध्ये सोने, चांदीत ‘हा’ बदल !

Gold Silver Rate : गेल्या काही दिवसातील उलथापालथ लक्षात घेता सोने चांदीच्या दराची अनिश्चितता कायम आहे. …अधिक वाचा
14:05 (IST) 15 Sep 2025

शरद पवार यांच्यासमोर जीपवर कांद्यांचा ढीग…, खुल्या जीपमधून नाशिकमधील मोर्चात सहभागी

शेतकरी हाच आपल्या पक्षाचा प्राण असल्याचे हेरुन आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर, राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाने तयारीला सुरुवात केली. …सविस्तर वाचा
14:02 (IST) 15 Sep 2025

Water Cut In Thane : ठाण्याच्या ‘या’ भागात शुक्रवारी पाणी नाही.., पाणी काटकसरीने वापरण्याचे पालिकेचे आवाहन

कळवा, मुंब्रा, दिवा यांच्यासह वागळे आणि माजिवडा-मानपाडा प्रभाग समितींचा काही भागांचा पाणी पुरवठा बंद राहणार असून पाणी काटकसरीने वापरण्याचे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे. …वाचा सविस्तर
13:55 (IST) 15 Sep 2025

पुणे : भूगाव बाह्यवळण रस्त्याच्या कामाला गती; चांदणी चौक ते भूगाव मार्गातील वाहतूक कोंडी सुटणार

भूगाव बाह्यवळण रस्त्याचे काम गेल्या तीन वर्षांपासून रखडले असून या कामाच्या प्रकल्पाला अखेर गती मिळाली आहे. …सविस्तर बातमी
13:53 (IST) 15 Sep 2025

नगर जिल्ह्याच्या दक्षिण भागातील गावांना पुराच्या पाण्याचा फटका; प्राथमिक शाळांना सुट्टी जाहीर

हवामान विभागाने नगर जिल्ह्याला पुन्हा उद्या, मंगळवार व परवा, बुधवार असे दोन दिवस येलो अलर्ट जारी केला आहे. रात्रीपासून सुरू असलेल्या पावसाने नगर शहरातील अनेक रस्ते जलमय झाले. …अधिक वाचा
13:41 (IST) 15 Sep 2025

मुसळधार पावसाचा विमान सेवेला फटका, नेमके काय घडले ?

हवामान विभागाने पुणे शहरात काल ‘ऑरेंज अलर्ट’ दिला होता. त्यानुसार पुणे शहर आणि विमानतळ परिसरात काल रात्री मुसळधार पावसाने हजेरी लावली. …अधिक वाचा
13:39 (IST) 15 Sep 2025

“सगळेच ईडी, सीबीआयला घाबरणारे…”, सुप्रिया सुळे यांनी गिरीश महाजनांना सुनावले

आगामी महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर, राष्ट्रवादीच्या (शरद पवार) वतीने रविवारी येथे राज्यस्तरीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर पार पडले. …सविस्तर वाचा
13:39 (IST) 15 Sep 2025

सत्तेचा सतत सहवास, पण चव्हाण म्हणतात ‘‘तो वनवास’’ ,७३ वर्षांपैकी ६० वर्षे पिता-पुत्रांस काँग्रेस पक्षाकडून मानाची पदे

काँग्रेसच्या सत्ताकाळात इंदिरा गांधी यांच्यापासून ते राजीव-सोनिया गांधीपर्यंतच्या पक्षाध्यक्षांनी शंकररावांच्या ज्येष्ठतेचा मान राखत त्यांना केंद्र सरकारमध्ये महत्त्वाची पदे दिली. …सविस्तर बातमी
13:32 (IST) 15 Sep 2025

पवना धरणातून पाण्याचा विसर्ग; पाणीपुरवठा दररोज होणार का? प्रशासनाने दिली महत्त्वाची माहिती

पवना नदी दुथडी भरून वाहत असून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. …अधिक वाचा
13:28 (IST) 15 Sep 2025

पाकिस्तानमधून चोरून आणलेले १२ कोटींचे खजूर जप्त; महसूल गुप्तचर संचलनालयाची कारवाई

पाकिस्तानमधून आलेले सुके खजूर व सौंदर्यप्रसाधनांनी भरलेले २८ कंटेनर महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) जप्त केले आहेत. …सविस्तर वाचा
13:19 (IST) 15 Sep 2025

Pune Theur Flood update: थेऊर येथील ओढ्याला पूर; १५० नागरिक अडकले, पीएमआरडीएकडून नागरिकांची सुखरूप सुटका

पुरामुळे जवळपास १५० लोकांच्या वस्तीत पाणी शिरले. सोमवारी पहाटे तीन वाजता ही घटना घडली. …वाचा सविस्तर
13:18 (IST) 15 Sep 2025
दुपारी १२ ते ५ या वेळेतच प्रवासाचे नियोजन करा! पावसाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलिसांचे पुणेकरांना अवाहन

पुण्यात गेल्या दोन दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. यादरम्यान पुणे वाहतूक शाखेच्या उपआयुक्तांनी नागरिकांना महत्त्वाचे आवाहन केले आहे.

– पुणे शहरात झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले असून वाहतूक संथ गतीने सुरू आहे.

-नागरिकांनी प्रवास करण्यापूर्वी आपल्या मार्गावरील वाहतूक कोंडीची माहिती करून घ्यावी.

-शक्य असल्यास पर्यायी मार्गांचा वापर करावा.

-अत्यावश्यक कारणाशिवाय प्रवास टाळावा अथवा दुपारी १२.०० ते ५.०० या वेळेतच नियोजन करावे.

-संध्याकाळी ५.०० ते ८.०० या गर्दीच्या वेळेत प्रवास टाळावा.

सर्व नागरिकांनी सहकार्य करावे अशी विनंती, वाहतूक पोलिसांनी केली आहे.

13:17 (IST) 15 Sep 2025

Pune Flood Alert : खडकवासल्यासह पानशेत आणि वरसगाव धरणातून नदीपात्रात विसर्ग; जिल्हा प्रशासनाकडून धोक्याची सूचना

Pune Rain Updares : खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये सोमवारी सकाळी १४ हजार ५४७ क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला. …सविस्तर वाचा
13:07 (IST) 15 Sep 2025

शरद पवार यांचा जयजयकार, तुतारी, राष्ट्रवादीचे झेंडे…, नाशिकमध्ये आक्रोश मोर्चाची जय्यत तयारी

नाशिक येथे रविवारी पदाधिकारी प्रशिक्षण शिबीर घेतल्यानंतर सोमवारी ईदगाह मैदानातून जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात येत आहे. …सविस्तर वाचा
13:00 (IST) 15 Sep 2025

Pune Heavy Rain : साठलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी महापालिका कर्मचारी रस्त्यावर

रस्त्यावर साठलेले पाणी वाहून जात नसल्याने गुडघा भर पाण्यामधून नागरिकांना आणि वाहन चालकांना मार्ग काढावा लागत आहे. …सविस्तर बातमी
12:53 (IST) 15 Sep 2025

पनवेलमधील कुंभारवाडा, कच्छी मोहल्यात पाणी साचले

पनवेल शहर हे खाडीकिनारपट्टीला खेटून असल्याने यापूर्वी अतिवृष्टीमध्ये कच्छी मोहल्ला व इतर परिसराला त्याची झळ पोहचत होती. …अधिक वाचा
12:44 (IST) 15 Sep 2025

Autism Therapy : ऑटिझम थेरपीत नवे क्षितिज! महाराष्ट्रात वाढते आधुनिक उपचारांचे प्रयत्न…

Autism Cases Rise In Maharashtra जागतिक आरोग्य संघटना आणि इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या ताज्या अहवालानुसार भारतातील दर १०० मुलांपैकी १ ते १.५ मुलांमध्ये ऑटिझमची लक्षणे आढळतात. …वाचा सविस्तर
12:44 (IST) 15 Sep 2025

Autism Therapy : ऑटिझम थेरपीत नवे क्षितिज! महाराष्ट्रात वाढते आधुनिक उपचारांचे प्रयत्न…

Autism Cases Rise In Maharashtra जागतिक आरोग्य संघटना आणि इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या ताज्या अहवालानुसार भारतातील दर १०० मुलांपैकी १ ते १.५ मुलांमध्ये ऑटिझमची लक्षणे आढळतात. …वाचा सविस्तर
12:38 (IST) 15 Sep 2025

नक्षलवाद्यांना आणखी एक धक्का, झारखंडमध्ये चकमकीत केंद्रीय समिती सदस्यासह तीन नक्षलवादी ठार…

पोलिसांच्या माहितीनुसार, पंटिटरी जंगल परिसरात मोठ्या संख्येने नक्षलवादी एकत्र आल्याची गोपनीय माहिती सुरक्षा यंत्रणेला मिळाली होती. …अधिक वाचा
12:34 (IST) 15 Sep 2025

Mumbai MD Drug Racket : घरात, शेतात आणि गोठ्यातही एमडीचे उत्पादन; स्थानिक पातळवरील निर्मितीने पोलिसांपुढे आव्हान

MD Drug Local Production : पूर्वी परदेशातून तस्करीच्या मार्गाने येणारा एमडी (मॅफेड्रॉन) हा अमली पदार्थ आता स्थानिक पातळीवर तयार करण्यात येऊ लागले आहे. …वाचा सविस्तर