Maharashtra Breaking News Today, 07 July 2022 : शिवसेनेत बंडाळी झाल्यानंतर तब्बल ४० आमदार भाजपासोबत हातमिळवणी करत सरकारमध्ये सहभागी झाले. त्यापाठोपाठ आता भाजपाच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्यासाठी शिवसेनेतील खासदार देखील पुढे येऊ लागले आहेत. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंची डोकेदुखी वाढत असताना संजय राऊतांवर बंडखोरांनी सुरू केलेल्या आरोपांमुळे देखील त्यांच्यासमोरचं आव्हान अधिक खडतर झालं आहे. एकीकडे राजकीय आरोप-प्रत्यारोपांचा पाऊस पडावा इतके राजकारणी आक्रमक झालेले असताना दुसरीकडे मान्सूननं राज्यात दिलासादायक हजेरी लावली आहे.

Live Updates

Maharashtra Live Updates Today : महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर!

11:06 (IST) 7 Jul 2022
तीन वर्षांमध्ये एकही विद्यार्थी वर्गात आला नाही, शिक्षकाने परत केले २४ लाख रुपये

बिहारच्या मुझफ्फरनगरमधील नितिशेश्वर महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापकाने आपला संपूर्ण पगार परत केला आहे. ललन कुमार सप्टेंबर २०१९ मध्ये महाविद्यालयात रुजू झाले होते. पण ३३ महिन्यात एकही विद्यार्थी वर्गात आला नाही. यामुळे लालन कुमार यांनी ३३ महिन्यांमध्ये मिळालेला पगार म्हणजेच तब्बल २४ लाख रुपये परत केला आहे. अजिबात न शिकवता हा पगार घेणं माझ्या तत्वांच्या विरोधात असल्याचं सांगत लालन कुमार यांनी पगार परत केला आहे.

सविस्तर बातमी

11:05 (IST) 7 Jul 2022
धक्कादायक! सेक्ससाठी नकार देणाऱ्या शेजारी महिलेची गळा कापून हत्या

सेक्ससाठी नकार दिला म्हणून २५ वर्षीय तरुणाने शेजारी राहणाऱ्या महिलेची गळा चिरुन हत्या केल्याची धक्कादायक घटना घडलीआहे. दिल्लीमधील गांधीनगर परिसरात ही घटना घडली आहे. आरोपीची ओळख पटली असून मान सिंग हा मूळचा उत्तर प्रदेशचा रहिवासी असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. आरोपीला अटक करण्यात आली आहे.

सविस्तर बातमी

10:51 (IST) 7 Jul 2022
“संदिपान भुमरेंनी माझ्यासमोर लोटांगण घातलं होतं, हवं तर व्हिडीओ फूटेज काढतो”, संजय राऊतांचं टीकास्त्र

गेल्या दोन दिवसांपासून शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली आहे. संजय राऊतांमुळेच आम्ही शिवसेना सोडली, असं काही बंडखोर आमदारांनी जाहीरपणे म्हटल्यानंतर संजय राऊतांच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. विशेषत: बुधवारी संध्याकाळी संजय राऊतांनी माध्यमांच्या प्रश्नांवर नो कमेंट्स असं म्हणत दीड मिनिटांत संवाद आटोपल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. या पार्श्वभूमीवर आज सकाळी संजय राऊतांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत बंडखोर आमदारांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं.

वाचा सविस्तर

10:38 (IST) 7 Jul 2022
“उद्धव ठाकरेंनी मन मोठे करुन…”; राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मुर्मूंना पाठिंबा देण्याची आणखी एका शिवसेना खासदाराची मागणी

१८ जुलै रोजी होणाऱ्या देशाच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी एनडीएने आदिवासी नेतृत्व म्हणून द्रौपदी मुर्मू यांना उमेदवारी दिली आहे. अशा परिस्थितीत मुर्मू यांना एनडीएमध्ये सामील असलेल्या पक्षांचा पाठिंबा मिळत आहे. तसेच आदिवासी चेहऱ्यामुळे इतर पक्षही साथ देत आहेत. त्याचवेळी शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटानेही द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केला आहे.

सविस्तर वाचा

पाऊस (सांकेतिक फोटो)

Maharashtra Live Updates Today : महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर!