राज्यातील ६ जिल्ह्यांमध्ये ५ ऑक्टोबरला झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीची आज (६ ऑक्टोबर) मतमोजणी झाली. मिनी विधानसभा समजली जाणारी ही पोटनिवडणूक सर्वच पक्षांसाठी महत्त्वाची असल्यानं सर्वांनीच ताकद लावली होती. अखेर नागपूर, पालघर, धुळे, नंदूरबार, अकोला आणि वाशिमच्या जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर झालाय. जिल्हा परिषदेच्या एकूण ८५ जागांचा आणि १४४ पंचायत समितीच्या जागांचा निकाल लागलाय.

जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत कोणाला किती जागा?

जिल्हा भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस इतरनिकाल जाहीरएकूण जागा
अकोला१४१४
धुळे१५१५
नंदूरबार११११
नागपूर१६१६
पालघर१५१५
वाशिम१४१४
एकूण२३१२१७१७१६८५८५
जिल्हा परिषद पोटनिवडणूक निकाल २०२१

कोरोना संसर्ग आणि ओबीसी राजकीय आरक्षण रद्द झाल्यामुळे या पोटनिवडणुका लांबणीवर पडल्या होत्या. महाराष्ट्रातील या ६ जिल्हा परिषदांच्या पोटनिवडणुकीत चांगलीच ‘काटे की टक्कर’ पाहायला मिळाली.

Latest Updates:

नागपूर जिल्हा परिषद निवडणुकीतील विजयी उमेदवार

१. केळवद – सुमित्रा कुंभारे – काँग्रेस<br>२. वाकोडी – ज्योती सिरसकर – काँग्रेस
३. राजोला – अरुण हटवार – काँग्रेस
४. गुमथाळा – दिनेश ढोल – काँग्रेस
५. वदोडा – अवंतीका लेकुरवाळे – काँग्रेस
६. आरोली – योगेश देशमुख – काँग्रेस
७. करंभाड – अर्चना भोयर – काँग्रेस
८. निलडोह – संजय जगताप – काँग्रेस
९. गोधणी (रेल्वे) – कुंदा राऊत – काँग्रेस
१०. येनवा – समीर उमप – शेकाप
११. डिगडोह – रश्मी कोटगुले – राष्ट्रवादी
१२. भिष्णुर – प्रवीण जोध – राष्ट्रवादी
१३. बोथीय पालोर – हरिष उईके – गोंडवाना
१४. पारडशिंगा – मीनाक्षी सरोदे – भाजप
१५. सावरगाव – पर्वता काळबांडे – भाजप
१६. डिगडोह-इससानी – अर्चना गिरी – भाजप

अकोला जिल्हा परिषद पोटनिवडणुकीतील विजयी उमेदवार (एकूण जागा : 14)

१. अकोलखेड : जगन्नाथ निचळ : शिवसेना
२. घुसर : शंकरराव इंगळे वंचित
३. लाखपुरी : सम्राट डोंगरदिवे : अपक्ष
४. अंदूरा : मीना बावणे : वंचित
५. दगडपारवा : सुमन गावंडे : राष्ट्रवादी
६. अडगाव : प्रमोदीनी कोल्हे : अपक्ष
७. कुरणखेड : सुशांत बोर्डे : वंचित
८. बपोरी : मायाताई कावरे : भाजप
९. शिर्ला : सुनील फाटकर : वंचित
१०. देगाव : राम गव्हाणकर : वंचित
११. कानशिवनी : किरणताई आवताडे/मोहड : राष्ट्रवादी
१२. कुटासा : स्फुर्ती गांवडे : प्रहार
१३. तळेगाव : संगिता अढाऊ : वंचित
१४. दानापूर : गजानन काकड : काँग्रेस

एकूण जागा : १४
निकाल जाहीर : १४

वंचित : ६
अपक्ष : २
शिवसेना : १+ प्रहार १
राष्ट्रवादी : २
भाजप : १
काँग्रेस: १

वाशिम जिल्हा परिषद विजयी उमेदवार (एकूण जागा : 14)

१.काटा : संध्या देशमुख : काँग्रेस
२. पार्डी टकमोर : सरस्वती चौधरी : अपक्ष
३. उकळी पेन : सुरेश मापारी : शिवसेना
४. आसेगाव : चंद्रकांत ठाकरे : राष्ट्रवादी
५. कंझरा : सुनिता कोठाडे : राष्ट्रवादी
६. दाभा : आर. के. राठोड : राष्ट्रवादी कॉंग्रेस
७. फुलउमरी : सुरेखा चव्हाण : भाजप
८. कुपटा : उमेश ठाकरे : भाजप
९. तळप : शोभा सुरेश गावंडे : राष्ट्रवादी
१०. कवठा : वैभव सरनाईक : कॉंग्रेस
११. गोभणी : पूजाताई भुतेकर : जनविकास
१२. भर जहागिर : अमित खडसे : राष्ट्रवादी
१३. पांगरी नवघरे : लक्ष्मी सुनिल लहाने : वंचित
१४. भामदेवी : वैशाली लळे : वंचित

एकूण जागा : १४
निकाल जाहीर : १४

वंचित : २
अपक्ष : १
शिवसेना : १
राष्ट्रवादी : ५
भाजप : २
काँग्रेस : २
जनविकास : १

जिल्हानिहाय जिल्हा परिषदेच्या जागा

नागपूर – १६
धुळे – १५
अकोला – १४
वाशिम – १४
नंदूरबार – ११
पालघर – ०२

जिल्ह्यानिहाय पंचायत समिती जागा

नागपूर – ३१
धुळे – ३०
अकोला – २८
वाशिम – २७
नंदूरबार – १४
पालघर – १४

नंदूरबार

नंदुरबारमध्ये जिल्हा परिषदेच्या ११ गटांसाठी आणि पंचायत समितीच्या १४ गणांवरील उमेदवारांच्या राजकीय भविष्याचा निकाल घोषित झाला.

अकोला

अकोला जिल्ह्यात १४ जिल्हा परिषद जागा आणि २८ पंचायत समिती गणात पोटनिवडणूक पार पडली. या निवडणुकीतील मतदारांची संख्या ३ लाख ७१ हजार ६९० इतकी होती. जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या १४ निवडणूक विभागांमध्ये ६८ उमेदवार तर पंचायत समितीच्या २८ गणांमध्ये ११९ उमेदवार निवडणूक रिंगणात होते.

वाशिम

वाशिम जिल्हा परिषदेच्या १४ गटासाठी तर पंचायत समितीच्या २७ गणासाठी निवडणूक झाली. जिल्हा परिषदेच्या १४ गटासाठी ८२ उमेदवार निवडणूक मैदानात होते. पंचायत समितीच्या 27 गणांसाठी 135 उमेदवार रिंगणात होते.

“शेतकऱ्याच्या विरोधात जाणार त्याचा पराभव होणार”, अमरावती जिल्हा बँक विजयानंतर बच्चू कडूंची पहिली प्रतिक्रिया

धुळे आणि नंदूरबार

खान्देशात २५ गट, ४१ गणांसाठी मतदान झालं. धुळे आणि नंदुरबार दोन्ही जिल्ह्यातील २५ गटांसाठी ८३ उमेदवार तर ४१ गणांसाठी १११ उमेदवार निवडणूक रिंगणात होते.