सांंगली : माझ्या बदनामीसाठी बोलायला लावणारे राज्यात एकमेव ठिकाण मुंबईतील सागर बंगला असल्याचे मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी शुक्रवारी सांगलीत माध्यमांशी बोलताना सांगितले. बदनामीसाठी जातीयवादी पोलीस निरीक्षकांकडून गेवराईतील घरावर नोटीस चिकटविण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सांगलीत काल झालेल्या शांतता रॅलीनंतर आज जरांगे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, मराठा आरक्षणासाठी १२ महिने झाले आम्ही शांततेत आंदोलन करत आहोत. पण आमचे शांततेत सुरू असलेले आंदोलन सरकारला कळत नसेल तर आमचा नाइलाज आहे. आम्हाला राजकारण करायचे नाही. यामुळे निवडणूक लढवायची वेळ आली तर पक्ष काढणार नाही, मात्र अपक्ष उमेदवार उभे करणार.

हेही वाचा – के. भो. नाट्यगृहाच्या पुनर्उभारणीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून मदत – हसन मुश्रीफ

नेत्यांची माझ्यावर नाराजी असली तर, मराठा समाजाच्या नाराजीचे काय? मराठवाडा, पश्‍चिम महाराष्ट्रसह राज्यात संपूर्ण मराठा समाज एक झाला आहे. राजकारण्यांनीच मराठा समाजाची विभागणी केली आहे. मात्र, आता मराठा समाज हुषार झाला आहे. जो मराठा आरक्षणाला पाठिंबा देईल अशांनाही राखीव जागांवर पाठिंबा देऊन उभे करण्यात येईल. दहा टक्के आरक्षण आम्ही मागितले नव्हते. मात्र, तरीही सरकारने दिले, ही सरकारची चूक आहे, असे जरांगे म्हणाले.

हेही वाचा – Keshavrao Bhosale Theater Fire : केशवराव भोसले नाट्यगृहाच्या आगीमुळे कायदा सुव्यवस्थेला धोका निर्माण होण्याची प्रशासनाला भीती

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझ्या विरोधात बोलण्यासाठी पाच-सहा गट तयार केले आहेत असा आरोप करून जरांगे म्हणाले, ज्यावेळी माणूस कशातच सापडत नाही, त्यावेळी बदनामीची मोहीम राबविण्यात येते. बदनामी करण्यासाठी बोलायला लावणारे ठिकाण म्हणजे मुंबईतील उपमुख्यमंत्री फडणवीस यांचा सागर बंगला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Manoj jarange statement on sagar bungalow criticized devendra fadnavis ssb