सांगली : वाळवा येथे कृष्णेच्या पात्रात आयोजित करण्यात आलेल्या होडी शर्यतीमध्ये सांगलीवाडीच्या तरुण मराठा बोट क्लबने पहिला क्रमांक पटकावत २१ हजारांचे बक्षीस जिंकले. जिल्हा बँकेचे संचालक आणि युवा नेते राहुल महाडिक यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या या होडी शर्यतीचे उद्घाटन खासदार धैर्यशील माने यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम, भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, गौरव नायकवडी, स्वरूपराव पाटील, अमोल पडळकर, सतीश महाडिक, कपिल ओसवाल यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
वाळवा येथे आयोजित करण्यात आलेल्या होडी शर्यतीसाठी वाळवा आणि शिरगाव दरम्यानच्या कोट भागाची निवड करण्यात आली होती. होडीच्या शर्यती पाहण्यासाठी सांगलीसह इचलकरंजी, कोल्हापूर, बेळगाव येथून तरुणांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती.या स्पर्धेत तरुण मराठा बोट क्लबने पहिला क्रमांक पटकावला, याबद्दल या मंडळाला २१ हजाराचे बक्षीस देण्यात आले. तर डिग्रजच्या मंडळाने दुसरा, वारणामाई क्लब समडोळीचा तिसरा क्रमांक आला. त्यांना अनुक्रमे पंधरा व दहा हजारांचे बक्षीस देण्यात आले. न्यू शानदार क्लब समडोळी, राजर्षी क्लब कवठेपिरान या संघानाही उत्तेजनार्थ रोख बक्षिसे देण्यात आली.
सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक भाजपा नेते राहुलदादा महाडीक यांच्या वाढदिवसानिमित्त वाळवा येथे कृष्णा नदी पात्रात राहुलदादा महाडीक सामाजिक संस्था, वाळवा यांच्या वतीने आयोजित होड्यांच्या शर्यती पार पडल्या.
या प्रसंगी जेष्ठ नेते जयसिंगराव शिंदे, माजी जिल्हा परिषद सदस्य निजाम मुलाणी,नेर्लेचे माजी सरपंच जयकर कदम, महाडीक युवा शक्ती संचालक सुजित थोरात,डॉ.एस.व्ही.पाटील,वाळवा गावचे सरपंच संदेश कांबळे, शिरगावचे सरपंच दिलीप वाघमारे, वाळवा ग्रा.प.सदस्य इसाक वलांडकर, आर.एम.बागडी,डॉ.संतोष वाडकर,रोहित कोले,सचिन पाटील, सनी अहिर,महेश देवलेकर,पांडुरंग पाटील, दीपक हरगुडे,सचिन दडगे, अवधूत जमादार,वर्षाताई शिंदे, फिरोज वलांडकर,सारंग कदम,चंद्रकांत गावडे,अमन बागडी, अभिजित थोरात, प्रफुल्ल गणेशकर, चंद्रकांत डांगे, अमोल कोकाटे, सचिन कांबळे यांच्यासह इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
