भाजपा नेते आणि केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी आज शिवसेना(ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांच्यावर पुन्हा एकदा टीका केली आहे. पत्रकार शशिकांत वारिशे हत्या प्रकरणावरून राज्यातील राजकीय वातावरण गरम झाल्याचे दिसत आहे. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी काही गंभीर आरोप व विधानं केली आहेत. शिवाय आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रही पाठवलं आहे. यावर नारायण राणे यांनी प्रतिक्रिया दिली.

नारायण राणे म्हणाले, “हे जे घडलं आहे ते का घडलं, कशामुळे घडलं ते पोलीस चौकशीत बाहेर येईल. संजय राऊतांची मी दखल घेत नाही. ते काय महाराष्ट्राचे मोठे नेते असं कोणी नाही. बदनाम आहेत. सामना चालत नाही, म्हणून ते ब्रेकींग न्यूज टाकल्या जाव्यात यासाठी प्रयत्न करतात.”

Shashikant Warishe Murder: “…आणि लगेच दुसऱ्या दिवशी शशिकांत वारिशे यांची हत्या झाली” संजय राऊतांचं मोठं विधान!

याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे महिनाभराच्या आत मुंबईचे दोन दौरे झाल्याने विरोधकांकडून टीका, टिप्पणी सुरू आहे. यावरही नारायण राणे यांनी प्रत्युत्तर दिले. “आम्ही विकास केला आहे, मूलं जन्माला घातली नाव देण्याचा अधिकार कोणाला? वडिलांनाच ना?. आमच्या विविध योजना महाराष्ट्रात आहेत. काल दोन वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्यात आल्या. पंतप्रधानांना बोलावलं, पैसे ते देतात. त्यात चुकीचं काय? अडीच वर्षांत शिवेसेनेने काय केलं, हे त्यांनी सांगावं. मातोश्री सोडून मंत्रालयात अडीच वर्षांत अडीच तास बसले. हे काय मुख्यमंत्री आहेत का?” असं म्हणत राणेंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.

हेही वाचा – पंतप्रधान मोदींच्या महिनाभरातील दोन मुंबई दौऱ्यांवर शरद पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले…

याशिवाय कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीबाबत बोलताना नारायण राणे यांनी “कसबा आणि चिंचवड या दोन्ही पोटिनिवडणुकीच्या जागा आम्ही मोठ्या मताधिक्क्याने जिंकणार आहोत. विरोधक धुळीसारखे उडवणार आहोत. भाजपा ग्रामपंचायत ते लोकसभा सर्व निवडणुका गांभीर्याने घेतो.” असं सांगितलं.