‘बिचारे देवेंद्र फडणवीस, केंद्राने त्यांचा शंकरराव चव्हाण केला’; प्रकाश आंबेडकरांचे खोचक ट्वीट

गेल्या १० दिवसांपासून सुरु असलेल्या सत्ता नाट्यावर अखेर पडदा पडला आणि एकनाथ शिंदे राज्याचे नवे मुख्यमंत्री झाले.

‘बिचारे देवेंद्र फडणवीस, केंद्राने त्यांचा शंकरराव चव्हाण केला’; प्रकाश आंबेडकरांचे खोचक ट्वीट
प्रकाश आंबेडकरांची देवेंद्र फडणवीसांवर खोचक टीका

राज्याच्या मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतली. तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. एकेकाळी मुख्यमंत्री पदावर काम करणारे फडणवीस आता उपमुख्यमंत्री म्हणून काम पाहणार आहेत. याच गोष्टीवरून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी फडणवीसांना टोला लगावला आहे. ‘बिचारे देवेंद्र फडणवीस’ म्हणत आंबेडकरांनी खोचक ट्वीट केले आहे.

शंकरराव चव्हाणांचा संदर्भ देत टोला

‘बिचारे देवेंद्र फडणवीस, देवेद्र फडणवीस यांचा केंद्रातील नेतृत्वाने शंकरराव चव्हाण केला !’ असं खोचक ट्वीट प्रकाश आंबेडकरांनी केलं आहे. १९७४ साली शंकरराव चव्हाण हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यांच्या मंत्रीमंडळात शरद पवार हे गृहराज्य मंत्री होते. १९७८ साली शरद पवार काँग्रेसमधून बाहेर पडले. शरद पवार जेव्हा राज्याचे मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांच्या मंत्रीमंडळात शंकराव चव्हाण यांनी अर्थमंत्री म्हणून काम केलं होतं. एकेकाळी मुख्यमंत्री म्हणून काम करणारे शंकरराव चव्हाण नंतर पवारांच्या काळात मंत्री म्हणून काम करत होते. याचाच संदर्भ देत आंबेडकरांनी देवेंद्र फडणवीसांना टोला लगावला आहे.

पाहा व्हिडीओ –

एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री

महाविकास आघाडी सरकार कोसळ्यानंतर भाजपा आणि शिंदे गटाने सत्ता स्थापनेचा दावा केला. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतील आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री म्हणून काम पाहतील अशी असा ठाम विश्वास व्यक्त करण्यात येत होता. मात्र, पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री असतील, अशी घोषणा फडणवीसांनी केली आणि सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. फडणवीस यांनी नव्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्रिपदी सहभागी व्हावे, असा पक्षाचा आदेश असल्याचे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले. फडणवीस हे नव्या सरकारमध्ये सहभागी होतील, असे ट्वीट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले होते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Prakash ambedkar criticize deputy chief minister devendra fandanvis dpj

Next Story
मुख्यमंत्री शिंदेंवरील अपात्रतेची कारवाई टाळण्यासाठी मंत्रीमंडळाच्या पहिल्याच बैठकीत मोठा निर्णय; उद्या आणि परवा…
फोटो गॅलरी