मुंबईतल्या गोरेगाव या ठिकाणी असलेल्या नेस्को मैदानात मनसेचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात राज ठाकरेंनी निवडणूक आयोगावर टीका केली. तसंच महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने ९६ लाख खोटे मतदार याद्यांमध्ये भरण्यात आले आहेत असा गंभीर आरोपही त्यांनी केला. माझ्याकडे याबाबतची खात्रीलायक माहिती असल्याचा दावा राज ठाकरेंनी केला.

काय म्हणाले राज ठाकरे?

मी तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा देतो. दिवाळीच्या मध्यात आपण आज हा मेळावा आयोजित केला आहे. हा तातडीचा मेळावा आहे. यावेळची निवडणूक आपण ठरवू तेव्हा लागेल. मतदार याद्यांचा गोंधळ आत्ताचा नाही. हा गेल्या काही वर्षांचा आहे. २०१६-२०१७ ला मी व्होटिंग मशीन आणि मतदार याद्यांच्या विरोधात आवाज उठवला होता. एमआयजी क्लबमध्ये ती पत्रकार परिषद झाली होती. त्यावेळी अनेकांना मी जे बोललो त्याचं गांभीर्य कळलं नव्हतं. प्रत्येकाच्या दरवाजावर टकटक झाली तेव्हा कळलं की काय प्रकार चालले आहेत.

महाराष्ट्रात ९६ लाख खोटे मतदार-राज ठाकरे

आत्ताही विधानसभेची निवडणूक झाली २३२ आमदार निवडून आले आहेत. एवढं प्रचंड यश मिळूनही महाराष्ट्रात सन्नाटा होता. मतदार तर आवाक झालेच होते पण निवडून आलेलेही आवाक झाले होते. कारण त्यांनाही कळलं नाही कसा निवडून आलो. मग सगळ्यांनाच समजलं की निवडणुका कशा प्रकारे चालल्या आहेत. कसे विजय मिळतात, कसं यश मिळतं ते कळलं. राज ठाकरेंच्या सभांना गर्दी होते पण मतांमध्ये रुपांतर होत नाहीत असं अनेक जण म्हणतात. असं केलं तर कशी काय मिळेल मतं? मला तर कळलं आहे की आत्ताच्या निवडणुकांसाठी १ जुलैला निवडणुकांसाठी यादी बंद केली आहे. जवळपास ९६ लाख खोटे मतदार महाराष्ट्राच्या यादीत भरले आहेत. मुंबईत ८ ते साडेआठ लाख मतदार, ठाण्यात, पुण्यात अशा प्रत्येक ठिकाणी भरले आहेत. अशा निवडणुका होणार आहेत तर मग प्रचार कशाला करायचा? असा सवाल राज ठाकरेंनी केला आहे. तुम्ही मतं द्या किंवा नका देऊ मॅच फिक्स झाली आहे. अशा प्रकारे निवडणुका होणार का? ही कोणती लोकशाही आहे?

शिवाय मला आणखी एक गोष्ट समजत नाही. आम्ही या सगळ्या घोळांबाबत निवडणूक आयोगाला प्रश्न विचारत आहोत. असं असताना सत्ताधारी पक्षांना राग का येतो आहे? कारण त्यांना माहीत आहे त्यांनी काय केलं आहे असंही राज ठाकरे म्हणाले आहेत. हीच माणसं जेव्हा विरोधी पक्षात होती त्यावेळी आत्ता जे मी बोलतो आहे तेच बोलत होते. माझ्याकडे नरेंद्र मोदींचं एक भाषण आहे. त्यात शेवटची दहा सेकंद नीट ऐका. असं म्हणत राज ठाकरेंनी मोदींचा व्हिडीओ लावला.

नरेंद्र मोदींचा व्हिडीओ काय?

मै आज सार्वजनिक रुपसे भारत के इलेक्शन कमिशन को गंभीर शिकायत कर रहाँ हूँ. अगर इलेक्शन कमिशन एक अंपायर के नाते निष्पक्ष भावसे आनेवाले चुनाव कराने की हिंमत रखता है तो ध्यानसे सुने. मेरा भाषण इलेक्शन कमिशन को पहुंचाया जाये. गुजरातमें शांतीसे चुनाव होता है तो क्रेडिट इलेक्शन कमिशन को नहीं जाता है, महाराष्ट्र, बिहार, बंगाल इन मे चुनाव शांतीसे होते तभी क्रेडिट इलेक्शन कमिशन को जाता है. हमारे लोगोंपर झुठे मुकदमे लगाये जा रहे हैं. आप अपनी जिम्मेदारी को सही ढंग से निभाये. मैने कुछ सिटो के नाम लिये थे, बंगाल, बिहार, पूर्व उत्तर प्रदेशमें यहीं होने वाला है. इलेक्शन की जिम्मेदारी नहीं है? की इलेक्शन शांतपूर्ण ना हो. प्रधानमंत्री से भी आपके पास ज्यादा हक है. तो आप करते क्यूँ नही? मेरी बात से बुरा लगता है तो केस कर दो. लेकिन निष्पक्ष चुनाव करना आपकी जिम्मेदारी है. मै बहुत गंभीर आरोप कर रहाँ हूं. लोकतंत्र ऐसे नही चलता. ३० तारीख की चुनाव मे रिगिंग हुआ है. असं मोदी या व्हिडीओत म्हणताना दिसत आहेत. मी काय वेगळं बोलतो आहे? असं राज ठाकरे म्हणाले.

विलास भुमरे यांचा व्हिडीओही लावा-राज ठाकरे

सत्ताधारी पक्षाचा आमदार सांगतो २० हजार मतं बाहेरुन आणली. पैठणचे आमदार आहेत की २० हजार मतं बाहेरुन आणली. मग एकनाथ शिंदे यांनी डोळा मारला की दाढीवरुन हात फिरवला. त्यानंतर मग भुमरे म्हणाले की मतदार स्थलांतरित झाले होते त्यांना बाहेरुन आणलं. असं मग भुमरे म्हणाले. हा व्हिडीओही राज ठाकरेंनी लावला.