अलिबाग: माझ्या संयमाला माझी कमजोरी समजू नका असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी भरत गोगावले यांच्या समोर हीशोबच मांडला.लोकसभा निवडणूकीत महाड मतदारसंघातून मला फक्त ३ हजारांचे मताधिक्य मिळाले. मात्र गोगावले विधानसभा निवडणूकीत २९ हजारांच्या मताधिक्याने निवडून आले. लोकसभा ज्या वेळला महाड पोलादपूरच्या मतपेट्या मोजणीसाठी येत होत्या, मी अनेक फेऱ्यामध्ये मागे होतो.

पण मी कधी गोगावले यांनी माझे काम केले नाही असे बोललो नाही. उलट महायुतीच्या आमदारांनी माझे प्रामाणिक काम केले अशी भूमिका वेळोवेळी मांडली. विधानसभा निवडणूकीत भरत गोगावले ज्यावेळी अर्ज भरायला आले. त्यावेळी मी आवर्जून उपस्थित राहिलो. पक्षाची ताकद ठाम पणे तुमच्या पाठीशी राहिल अशी ग्वाही त्यांना दिली. त्यानुसार पक्षाने प्रामाणिकपणे त्यांचे काम केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदिती तटकरे हीची रायगडच्या पालकमंत्री पदावर नेमणूक केली. त्यावेळी महाड मधील बिरवाडी फाट्यावर माझ्या नावाने शिव्यांची लाखोली वाहिली गेली. खर तर पालकमंत्री पदाची निवड हा सर्वस्वी मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे. त्यात माझा काहीच हस्तक्षेप नव्हता मात्र तरिही शिवसैनिकांकडून माझ्यावर आरोप केले गेले. गेली तीन महिने मी खूप सहन केले आहे. माझा सय्यम ही माझी कमजोरी समजू नका असा थेट इशारा सुनील तटकरे यांनी गोगावले आणि त्यांच्या पाठीराख्यांना दिला.

ते महाड शहरातील चांदे क्रिडांगणावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षप्रवेश मेळावा सायंकाळी उशीरा पार पडला. त बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे, अनिकेत तटकरे उपस्थित होते. यावेळी स्नेहल जगताप, हनुमंत जगताप यांचा पक्षप्रवेश पार पडला.