भाजपाचे नेते तथा आमदार प्रसाद लाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला, असे विधान केले आहे. प्रसाद लाड यांच्या या विधानानंतर राष्ट्रवादी तसेच विरोधी पक्षाच्या नेत्यांनी आक्रमक पवित्रा धारण केला आहे. आता माफी मागून चालणार नाही. तर भाजपाने आता रगडून प्रायश्चित्त केले पाहिजे, अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे. तर दुसरीकडे माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनीदेखील लाड यांच्या या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे. लाड यांनी केलेले विधान बेजबाबदारपणाचे आहे. त्यांनी या वक्तव्याबाबत स्पष्टीकरण दिले पाहिजे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात लक्ष घालावे. लाड यांच्या पक्षप्रमुखांनी त्यांना प्रशिक्षण दिले पाहिजे. ते जमत नसेल तर त्यांना महाराष्ट्रातून काढून टाकले पाहिजे, असे संभाजीराजे छत्रपती म्हणाले आहेत. ते ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> ‘शिवरायांचा जन्म कोकणात झाला’, प्रसाद लाड यांच्या विधानावर राज ठाकरेंची प्रतिक्रिया; म्हणाले, “शिवरायांकडून…”

“प्रसाद लाड यांचे विधान मी नुकतेच ऐकले. शिवाजी महाराज यांचा जन्म कोकणात झाला, असे ते म्हणत आहेत. हे दुर्दैव आहे. त्यांचा अभ्यास अपूर्ण आहे. प्रसाद लाड हे जबाबदार व्यक्तिमत्त्व आहेत. ते आमदार आहेत. मात्र शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाल्याचे ते म्हणत आहेत. ही शरमेची बाब आहे. मी त्यावर काय बोलणार. त्यांनीच याबाबत उत्तर द्यावे. लाड यांच्या पक्षाच्या प्रमुखांनी त्यांना प्रशिक्षण दिले पाहिजे. त्यांना हे जमत नसेल तर त्यांना महाराष्ट्राच्या बाहेर काढून टाका,” अशी भूमिका संभाजीराजे छत्रपती यांनी घेतली.

हेही वाचा >>> शिवाजी महाराजांविषयी बोलताना भाजपाचे प्रसाद लाड यांचे अजब विधान, म्हणाले “शिवरायांचा जन्म…”

“प्रसाद लाड यांनी बेजबाबदार विधान केलेच कसे. लहान मुलांना शिवाजी महाराजांचा इतिहास शाळेतच शिकवणे गरजेचे आहे. प्रसाद लाड यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले पाहिजे. इकडे शिवाजी महाराज आमचे आराध्य दैवत आहे. ते आमची अस्मिता आहेत, असे लाड म्हणतात. तर दुसरीकडे शिवाजी महाराज यांचा जन्म कोकणात झाला, असा दावा करतात. याबाबत त्यांनी स्पष्टीकरण दिले पाहिजे. नुसती माफी मागी मागून चालणार नाही. देवेंद्र फडणवीस यांनी यामध्ये लक्ष घालावे. देवेंद्र फडणवीस अभ्यासू आहेत,” अशी मागणीदेखील संभाजीराजे छत्रपती यांनी केली.

अमोल मिटकरी काय म्हणाले?

हेही वाचा >>> गोपीनाथ मुंडेंविषयी सुषमा अंधारेंचे मोठे विधान, नितीन गडकरींचे नाव घेत म्हणाल्या…

प्रसाद लाड यांच्या विधानानंतर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी आक्रमक झाले आहेत. “सकाळ झाली भाजपाचे लोक रोज एक बेताल व्यक्तव्य करत आहेत. अगोदर राज्यपाल यांनी महाराजांविषयी आक्षेपार्ह विधान केले. त्यानंतर सुधांशू त्रिवेदी, मंगलप्रभात लोढा यांनीदेखील वादग्रस्त विधान केले. त्यांनी शिवरायांवर वेगवेगळी वक्तव्यं करण्याची मालिकाच सुरू केली आहे. प्रसाद लाड यांनी नवाच जावई शोध लावला आहे. शिवरायांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला. शिवरायांची राजधानी रायगड होती, असे आम्ही वाचत आलो आहोत. मात्र लाड म्हणत आहेत की शिवरायांचा जन्म कोकणात झाला. विशेष म्हणजे ते स्क्रीप्ट वाजून असे सांगत आहेत. म्हणजे उद्या गुजरात महोत्सव घ्यायचा असेल तर गुजरातच्या लोकांना खुश करण्यासाठी ते शिवरायांचा जन्म गुजरातच्या सुरतमध्ये झाला, असे म्हणतील. हे अत्यंत चुकीचे आहे. याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मूक समर्थन कारणीभूत आहे,” अशी टीका अमोल मिटकरी यांनी केली.

हेही वाचा >>>प्रसाद लाड यांच्या शिवरायांवरील विधानानंतर अमोल मिटकरींचा हल्लाबोल, म्हणाले “आता नाक रगडून…”

प्रसाद लाड काय म्हणाले?

‘संपूर्ण भारताचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोकणात झाला. त्यानंतर रायगडावर त्यांचं बालपण गेलं. रायगडावर त्यांनी स्वराज्याची शपथ घेतली. त्यामुळे सुरुवात कोकणात झाली,’ असे विधान प्रसाद लाड यांनी केले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sambhajiraje chhatrapati criticize prasad lad on saying konkan is shivaji maharaj birth place prd
First published on: 04-12-2022 at 13:09 IST