सांगली : सांगलीमध्ये नूरा लढत व्हावी अशी अपेक्षा असलेल्यांचा अपेक्षाभंग माझ्या उमेदवारीने झाला असून मी जनतेचा उमेदवार असल्याचे विशाल पाटील यांनी सोमवारी सायंकाळी माध्यमांशी बोलताना सांगितले. लोकसभा निवडणुकीसाठी अपक्ष उमेदवारी कायम ठेवल्यानंतर पाटील म्हणाले, काँग्रेस सांगलीच्या मैदानात असू नये असे षडयंत्र होते. गेले काही दिवस विविध नेत्यांशी चर्चा केली. भाजपचा पराभव करणे आवश्यक असल्याने मी जनमताच्या पाठिंब्यावर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : सांगली: राजकीय दबाव झुगारुन विशाल पाटलांची बंडखोरी

ते पुढे म्हणाले, मला हवे ते चिन्ह मिळू नये यासाठीसुध्दा प्रयत्न झाले. गेले काही दिवस विविध पक्षांतील नेत्यांशी संवाद साधून भावना जाणून घेतल्या. आता या नेत्यांना अडचणीत न आणता थेट मतदारांना भेटणार आहे. उद्या हनुमान जयंतीला मारुती दर्शनानंतर नृसिंहवाडीमध्ये दत्तदर्शन करुन थेट जतमध्ये प्रचाराला जातोय. जनतेने निवडणूक हाती घेतली आहे. मी कुणावरही टीकाटिपणी न करता माझी भूमिका जनतेपर्यंत पोहचवणार असून ते मला साथ देतील असा विश्वास वाटतो.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sangli lok sabha independent candidate vishal patil to start campaigning from tomorrow css
Show comments