शिंदे गटातील नेते संजय राठोड यांचे राजकीय विरोधक असलेल्या माजी राज्यमंत्री संजय देशमुख यांनी आज (२० ऑक्टोबर) उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी हाती शिबंधन बांधले. आगामी काळात संजय राठोड यांना रोखण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्याकडून संजय देशमुख यांना बळ दिले जाणार आहे. तर संजय देशमुख यांनीदेखील विदर्भात उद्धव ठाकरे यांचे समर्थक वाढवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले आहे. पुढील काळात विदर्भातील कार्यकर्त्यांना उद्धव ठाकरे गटात सामील करण्यासाठी प्रयत्न करणार आहे, असे संजय राठोड यांनी सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> राज्यात ओला दुष्काळ जाहीर होणार का? कृषीमंत्री सत्तार स्पष्टच बोलले; म्हणाले “मंत्रीमंडळ बैठकीत…”

शिवसेना भवनात बाळासाहेब ठाकरे यांनी माझी जिल्हाप्रमुख म्हणून नियुक्ती केली होती. आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी माझ्या विनंतीला मान देऊन मला पक्षात स्थान दिले. मागील काही दिवसांपासून बऱ्याच राजकीय घडामोडी घडल्या. माझी ८० वर्षाची आई आहे. रुग्णालयात असताना ती टीव्ही पाहात होती. तेव्हा तिला मी शिवसेनेत जाऊ का? असे विचारले होते. तेव्हा माझ्या आईने मला मार्मिक उत्तर दिले होते. तुझा जन्मच शिवसेनेसाठी झाली आहे, असे ती म्हणाली होती, अशी आठवण संजय देशमुख यांनी सांगितली.

हेही वाचा >>> संजय देशमुख यांनी हाती शिवबंधन बांधताच उद्धव ठाकरेंची महत्त्वाची घोषणा; म्हणाले “तारीख ठरवा, मी…”

वाशिम, यतमाळ जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी कोणतेही पद मिळालेले नसताना उद्धव ठाकरे यांची साथ दिली. मागील काही निवडणुकांत संजय राठोड मोठ्या मताधिक्यांने निवडून आले होते. मात्र त्यांच्या पाठीमागे खरी ताकद ही शिवसैनिकांची आहे. घर तिथे शिवसैनिक निर्माण करण्याचे आपण काम करणार आहोत. उद्धव ठाकरे यांनी केलेल्या कामाची नोंद विदेशातही घेण्यात आली आहे, असे म्हणत देशमुख यांनी उद्धव ठाकेर यांची स्तुती केली.

हेही वाचा >>> परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांवर संकट; धनंजय मुंडे म्हणाले, “कृषीमंत्री तर सोडा, इतर मंत्रीदेखील कुठं…”

मागील काही काळात मी काही लोकांशी भेटलो. हे लोक देवाने उद्धव ठाकरे यांच्या रुपात गरिबांतील माणूस धाडला आहे, असे म्हणायचे. मी सर्व पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन विदर्भात शिवसेनेचे जाळे कसे निर्माण करता येईल, यासाठी प्रयत्न करणार आहे. आपण सर्व मिळून विदर्भात दहा हजार कार्यकर्त्यांना शिवबंधन बांधण्यासाठी प्रयत्न करणार आहे, अशी घोषणा संजय देशमुख यांनी केली. तसेच आपण शिवसेना कशी वाढवता येईल, त्यासाठी प्रयत्न करूयात, असेही संजय देशमुख म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay deshmukh joined uddhav thackeray said will try to expand supporters in vidarbha prd