ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची आज (रविवार) नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे जाहीर सभा होत आहे. या सभेतून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर जोरदार टीकास्र सोडलं आहे. राऊत यांनी आपल्या भाषणातून अप्रत्यक्षपणे मालेगावचे आमदार दादा भुसे यांचा उल्लेख ढेकूण असा केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आज सकाळपासून उद्धव ठाकरे यांची तोफ मालेगावात धडाडणार, अशा बातम्या टीव्हीवर चालवल्या जात आहेत. पण मालेगावचं ढेकूण चिरडायला तोफेची गरज नाही, अशी टीका संजय राऊतांनी केली. दरम्यान, त्यांनी शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे, गुलाबराव पाटील यांच्यावरही निशाणा साधला.

संजय राऊत आपल्या भाषणात म्हणाले, “या महाराष्ट्रात शेतकरी, कष्टकरी आणि बेरोजगारांचे असंख्य प्रश्न आहेत. कांद्याला भाव मिळत नाहीये. कांदा रस्त्यावर फेकला जातोय. पण आता आपल्याला सुहास कांदेला बाजुच्या रस्त्यावर फेकायचं आहे आणि कांद्याला भाव द्यायचा आहे. आपल्याला तिकडे गुलाबराव पाटलाला रस्त्यावर फेकायचं आहे. ज्यांनी-ज्यांनी उद्धव ठाकरेंशी आणि शिवसेना प्रमुखांशी गद्दारी केली, त्या प्रत्येकाला त्याच खोक्याखाली चिरडायचं आहे.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay raut on suhas kande gulabrao patil uddhav thackeray rally in malegaon rmm