राज्याच्या राजकारणात काल (बुधवारी, २३ मार्च) सर्वाचं लक्ष वेधून घेणारं एक चित्र पाहायला मिळालं. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तसेच शिवसेना पक्षप्रमुख (ठाकरे गट) उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधीमंडळाच्या बाहेर एकत्र दिसले. दोघांना एकत्र पाहून, हसत संवाद करताना पाहून राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. सत्तासंघर्षानंतर पहिल्यांदाच हे दोन नेते माध्यमांसमोर एकत्र दिसले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

फडणवीस आणि ठाकरे भेटीनंतर भाजपा आमदार आणि शिवसेनेच्या (शिंदे गट) आमदारांनी या क्षणाचं कौतुक केलं. तर भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरे यांना विधीमंडळात राजकीय इशारा दिला. दुसऱ्या बाजूला मनसेने ही भेट ठरवून झाल्याचं म्हटलं आहे. या भेटीवर एकीकडे विविध राजकीय चर्चा सुरू झाल्या आहेत. अशातच ठाकरे गटाचे नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी या चर्चांना पूर्णविराम देण्याचं काम केलं आहे.

संजय राऊत म्हणाले की, “विधीमंडळात जाण्यासाठी दोन्ही नेत्यांसाठी वेगळा रस्ता निर्माण करता आला तर बघू. सध्या विधानसभेत जाण्याचा रस्ता एकच आहे. त्यामुळे या चर्चा आणि अफवांना काहीही अर्थ नाही.”

हे ही वाचा >> “आम्हाला बाहेरून सलीम-जावेद लागत नाहीत”, राज ठाकरेंना संजय राऊतांचा टोला, म्हणाले, “दुसऱ्यांची डोकी…”

काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार?

भाजपा नेते मुनगंटीवार काल विधानसभेत म्हणाले. “उद्धवजी, मी अनेकदा तुम्हाला व्यक्तिगत भेटून सांगायचो की झाडाला फळं येतील. पण तुम्ही झाडाशीच नातं तोडलं. आता त्याला काय करणार. मी व्यक्तिगत तुम्हाला येऊन सांगायचो की उद्धवजी, या झाडाला कोणतं खत पाहिजे. तुम्ही ते खत न देता दुसरंच खत दिलं. त्याच्यामुळे त्या झाडाला फळं कशी येतील? मी एकदा नाही, तीनदा विनंती केली होती”,

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay raut says discussions on uddhav thackeray devendra fadnavis meeting is meaningless asc