Sharad Pawar : ‘राज ठाकरेंची गाडी तुम्ही अडवायला सांगितली?’, या प्रश्नावर शरद पवारांचं उत्तर, म्हणाले; “त्यांनी माझं नाव…”

राज ठाकरेंची गाडी काही दिवसांपूर्वी अडवण्यात आली होती, त्यानंतर राज ठाकरेंनी थेट शरद पवारांचं नाव घेत आरोप केला होता. त्याबाबत विचारलं असता आता शरद पवारांनी उत्तर दिलं आहे.

What Sharad Pawar Said About Raj Thackeray?
शरद पवारांनी राज ठाकरेंच्या आरोपांवर काय उत्तर दिलं आहे? (फोटो सौजन्य-दक्षजा धुरी, ग्राफिक्स टीम, लोकसत्ता ऑनलाईन)

Sharad Pawar : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ताफ्यावर शुक्रवारी बीडमध्ये ‘सुपारीबाज’ म्हणत काही लोकांनी सुपाऱ्या फेकल्या. यावरून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली. ज्यानंतर शरद पवारांचं आणि उद्धव ठाकरेंचं नाव घेऊन राज ठाकरेंनी टीका केली. याबाबत आज शरद पवारांना ( Sharad Pawar ) विचारलं असता त्यांनी या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे.तसंच मी असे मार्ग कधीही वापरत नाही असंही शरद पवार ( Sharad Pawar ) यांनी म्हटलं आहे.

शरद पवारांचं नाव घेऊन काय म्हणाल होते राज ठाकरे?

“शरद पवारांचं राजकारण पाहिलं तर जेम्स लेन प्रकरणावरून यांनी सुरुवात केली. टप्प्याटप्प्याने त्यांनी हे केलं. स्वत:च्या जातीबद्दल वर्षानुवर्षं प्रेम असतं. पण दुसऱ्याच्या जातीबद्दल द्वेष निर्माण करणं हे शरद पवारांनी राष्ट्रवादी निर्माण केली तेव्हापासून सुरू केलं”, असं राज ठाकरे म्हणाले. “त्यांना वाटत असेल की त्यांचे इतके खासदार निवडून आलेत तर त्या खासदारकीवर यांनी जाऊ नये. त्यांचा राग देवेंद्र फडणवीसांवर असेल तर तुम्ही त्या पद्धतीने बोला. समाजांमध्ये कशाला भांडणं लावत आहात?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

Sharad Pawar : मराठा-ओबीसी आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी शरद पवार मैदानात, मुख्यमंत्री व केंद्र सरकारला म्हणाले…

माझ्या दौऱ्यात या लोकांनी अडथळे आणण्याचे प्रयत्न केले. उद्या जर माझं मोहोळ उठलं तर निवडणुकीच्या काळात एकही सभा यांना घेता येणार नाही. त्यामुळे यांनी माझ्या वाट्याला जाऊ नये. मी मागेच म्हटलं होतं, यांच्याकडे प्रस्थापित आहेत, माझ्याकडे विस्थापित आहेत. असंही राज ठाकरे म्हणाले. याबाबत आज शरद पवारांना विचारलं असता शरद पवारांनी ( Sharad Pawar ) याबाबत थेट उत्तर दिलं.

शरद पवार राज ठाकरेंबाबत काय म्हणाले?

“राज ठाकरेंनी दोन- तीन वेळा माझं नाव का घेतलं हे मला कळलेलं नाही. कारण मी या रस्त्याने कधीच जात नाही. मला माझा महाराष्ट्र थोडासा ओळखतो. माझी अशी पार्श्वभूमी नाही, मी कधीही आग्रह केलेला नाही करणार नाही. त्यांनी कारण नसताना माझं नाव घेतलं आहे. मी पण आज महाराष्ट्रात फिरत आहे. माझ्या पण गाड्या अडवल्या आहेत. आता हे पण पवारांनी सांगितलय का मला अडवा?” अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी ( Sharad Pawar ) दिली.

यानंतर राज ठाकरेंचा जो आरोप होता की शरद पवारांनी ( Sharad Pawar ) मणिपूर सारखी स्थिती निर्माण करायला हातभार लावू नये यावरही पवारांनी भाष्य केलं. शरद पवार म्हणाले, मणिपूरचा प्रश्न वेगळा आहे. हातभार लावण्याचा प्रश्न कुठे येतो. मी बोललो हे हातभाराचे लक्षण आहे की सौजन्याचे लक्षण आहे? असा प्रति सवाल पवारांनी ( Sharad Pawar ) केला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sharad pawar gave this answer on raj thackeray alligation what did he say scj

First published on: 12-08-2024 at 14:13 IST

आजचा ई-पेपर : महाराष्ट्र

वाचा
Show comments