उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्याच्या भाषणातून एकनाथ शिंदे यांच्या कुटुंबाला लक्ष्य केलं होतं. “बाप मुख्यमंत्री, कारटं खासदार आणि आता नातू नगरसेवक पदावर डोळे लावून बसला आहे. त्याला मोठं तर होऊ द्या,” असा उल्लेख उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात केला. यानंतर आता शिंदे गटासह भाजपा नेत्यांकडून उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दरम्यान, भारतीय जनता पार्टीचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनीही उद्धव ठाकरेंवर टीकास्र सोडलं आहे. दसरा मेळाव्याच्या भाषणातून उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या दीड वर्षाच्या नातवाचा उल्लेख करून राजकारणाचा स्तर सोडला, अशी टीका मुनगंटीवार यांनी केली आहे. ते चंद्रपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

हेही वाचा- “मोदी-शाहांनी लिहिलेलं भाषण मुख्यमंत्र्यांनी…” नाना पटोलेंचा एकनाथ शिंदेंना खोचक टोला!

उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यातील भाषणावर प्रतिक्रिया देताना मुनगंटीवार म्हणाले, विजयादशमीच्या निमित्ताने भाषण देताना विचारांचं सोनं वितरीत होईल, असं आपल्याला वाटलं होतं. पण तिथे विचारांऐवजी सत्ता गेल्याचं मनामध्ये असलेलं दु:ख, राग व्यक्त झाला. नरेंद्र मोदी किंवा अमित शाह यांच्याबाबत निम्न शब्दांचा वापर करता करता त्यांची सत्ता कधी गेली, हेच त्यांना कळालं नाही.

हेही वाचा- Dasara Melava: १७९५ बसेससाठी १० कोटी कुणी भरले? कागदोपत्री तपशील देत अंबादास दानवेंचा शिंदे गटाला सवाल

विजयादशमीचा उत्सव हा प्रेमाचा आणि आनंदाचा उत्सव आहे. या दिवशी आपण वैर विसरून आनंद वाटत असतो. पण उद्धव ठाकरेंनी शिवतीर्थावरून एकनाथ शिंदे यांच्या दीड वर्षाच्या नातवाचा उल्लेख केला, हे चुकीचं आहे. राजकारणामध्ये आपण कोणत्या स्तरावर गेलो, याचं विश्लेषण जनता केल्याशिवाय राहणार नाही, असा टीका मुनगंटीवार यांनी केली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sudhir mungantiwar on uddhav thackeray statement on grandson of eknath shinde dasara melava rmm
First published on: 06-10-2022 at 23:38 IST