शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची ५ मार्चला खेडमध्ये जाहीर सभा पार पडली. या सभेत उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर हल्लाबोल केला होता. त्या सभेला प्रत्युत्तर देण्यासाठी त्याच गोळीबार मैदानात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेचं आयोजन केलं आहे. यावर आता मंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘एबीपी माझा’शी बोलताना उदय सामंत म्हणाले, “ही प्रत्युत्तर देण्यासाठी सभा नाही. ‘मी रिकाम्या हाताने आलो आहे. माझ्याकडं तुम्हाला द्यायला काही नाही,’ असं पाच तारखेला सांगायला काही लोक आली होती. त्याला एकनाथ शिंदे उत्तर देतील. आमच्याकडे हात रिकामे आहेत, म्हणून तुम्ही आमच्याकडे राहा, असं सहानभुतीचं भाषण एकनाथ शिंदे करणार नाहीत.”

हेही वाचा : “ज्यांच्यात नाही दम, ते रामदास कदम”, भास्कर जाधव यांचा टोला, म्हणाले, “बेडूक…”

“मग विचार बदलणारी वॉशिंग मशीन…”

“पाच तारखेच्या सभेत विचार नव्हते फक्त शिव्या होत्या. त्या सभेत अनंत गितेंनी फार मोठी टीका केली. पण, बंडाची सुरूवात अनंत गितेंनी केली होती. उद्धव ठाकरेंना आव्हान देत, शरद पवारांनी काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून राष्ट्रवादीची निर्मिती केल्याचं अनंत गितेंनी सांगितलं होतं. काही लोक सांगतात भाजपाकडे वॉशिंग मशीन आहे. मग विचार बदलणारी वॉशिंग मशीन काही लोकांकडे आहे ना,” असा टोला सामतांनी लगावला आहे.”

“त्यामुळे ठाकरे गटापेक्षा राष्ट्रवादीचे लोक जास्त…”

“आमची सभा बाळासाहेबांच्या विचारांची असणार आहे. बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना वाढवण्यासाठी जे-जे सांगितलं, केलं आणि पथ्य पाळली, ती एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली शिवसेना पाळणार आहे. पाच तारखेला एक लाख लोकं होती, हे ठाकरे गटाचे नेते कमी आणि राष्ट्रवादीवाले जास्त सांगत आहेत. त्यामुळे ठाकरे गटापेक्षा राष्ट्रवादीचे लोक जास्त प्रवक्ते झाले आहेत,” असंही उदय सामतांनी म्हटलं.

हेही वाचा : “भाजपाला आमची गरज नसेल, तर…”, महादेव जानकर यांचा इशारा

“एकतर त्यांच्याकडं माणसं नाहीत किंवा..”

“राष्ट्रवादीचा एक आमदार फोडून रामदास कदम आणि योगेश कदम यांच्यासमोर उभ करण्याचा प्रयत्न केला जातोय. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पक्षात घेतले जात आहेत. याचा अर्थ असा आहे, एकतर त्यांच्याकडं माणसं नाहीत किंवा राष्ट्रवादीवर त्यांचा विश्वास नाही,” असा टोमणा समातांनी ठाकरे गटाला लगावला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uday samant taunt uddhav thackeray khed sabha eknath shinde ssa