महाराष्ट्रात अतिवृष्टीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी महाराष्ट्र सरकार खंबीरपणे उभं असून, त्यांना सर्वतोपरी मदत दिली जाईल. आतापर्यंत २,२१५ कोटींची मदत जाहीर करण्यात आली आहे. तसेच प्रचलित निकषांमध्ये शिथिलता आणून शेतकऱ्यांना आणखी मदत दिली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बुधवारी लातूर दौऱ्यावर होते. तर आज उद्धव ठाकरेंनी लातूरला भेट दिली. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांनी नुकसानग्रस्त भागांचा आढावा घेतला.
काय म्हणाले उद्धव ठाकरे?
“मी शेतकऱ्यांना धीर द्यायला आलो आहे. कुणीही आस्मानी संकटामुळे खचून जाऊ नका, वेडंवाकडं पाऊल उचलू नका. हे माझं तुम्हा सगळ्या शेतकऱ्यांना आवाहन आहे. शेतकरी संकटात सापडला आहे. आम्ही सरकारकडून जी मदत तातडीने हवी आहे ती आम्ही मिळवून देऊ. शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत केली जावी आणि कर्जमुक्ती करावी या मागणीसाठी आम्हीही आग्रही राहू. तातडीची मदत सरकारला देऊ द्या त्यानंतर बाकीच्या गोष्टीही आपण पाहू. शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचीही मागणी आम्ही करणार आहोत.” असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. आज उद्धव ठाकरेंनी लातूरच्या काटगाव या ठिकाणी उद्धव ठाकरे आले होते. त्यानंतर उद्धव ठाकरे हे धाराशिव, बीड, छत्रपती संभाजी नगर आणि जालना या ठिकाणीही जाणार आहेत.
उद्धव ठाकरे पाच जिल्ह्यांचा दौरा करणार
उद्धव ठाकरे यांनी लातूरमधल्या काटगाव या ठिकाणी गेले होते. तिथे त्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची भेट उद्धव ठाकरेंनी घेतलं. पिकांची पाहणीही उद्धव ठाकरेंनी केली. एका दिवसात उद्धव ठाकरे पाच जिल्ह्यांचा दौरा करणार आहेत. मराठवाड्यातले जिल्हे त्याचप्रमाणे सोलापूर या ठिकाणी पावसामुळे मोठं नुकसान झालं आहे. अनेक शेतकऱ्यांना आणि गावकऱ्यांना स्थलांतरित करावं लागलं आहे. आता उद्धव ठाकरे हे शेतकऱ्यांच्या बांधावर गेले होते. त्यावेळी त्यांनी पूरग्रस्तांना हेक्टरी ५० हजार रुपये तातडीची मदत सरकारने जाहीर करावी अशीही मागणी उद्धव ठाकरेंनी केली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं शेतकऱ्यांना मदतीचं आश्वासन
उपमुख्यमंत्री अजित पवार बुधवारी मराठवाड्यातील पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर होते. यावेळी शेतकऱ्यांनी अजित पवारांकडे मागणी केली की पूरग्रस्तांना सरकारने मदत करावी, अनेक शेतकऱ्यांचं पिक वाहून गेलं आहे, जमिनी खरडून गेल्या आहेत. यावर अजित पवार म्हणाले, “मी हे सगळं पाहायला इथे आलो. पाणी ओसरू द्या, किती रान वाहून गेलं आहे ते पाहू द्या, ज्यांची जमीन खरडून गेली आहे, ज्यांच्या जमिनी नदीकाठी आहेत, ती मळीची जमीन असते ती वाहून गेली असेल तर त्यासंदर्भात आमचा निर्णय झाला आहे. एकदा पाणी ओसरू देत, सर्वांना सरकार मदत करणार आहे.