नागपूरमध्ये राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. अशातच शिवसेना ( ठाकरे गट ) आमदार आदित्य ठाकरे यांची दिशा सालियान मृत्यू प्रकरणात विशेष तपास पथकामार्फत ( एसआयटी ) चौकशी होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. यावरून शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे सरकारला थेट इशारा दिला आहे. आम्ही सांगू तेव्हा तुमच्याही कुटुंबाच्या एसआयटी चौकशा लावू, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. ते विधिमंडळाच्या बाहेर प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उद्धव ठाकरे म्हणाले, “ज्यांच्यापासून भीती असते, त्यांच्यावर आरोप केले जातात. पण, आम्हालाही एसआयटी चौकशा लावता येतील. त्यामुळे त्यांनी त्याच्यात जाऊ नये. अन्यथा आम्ही सांगू तेव्हा तुमच्या कुटुंबीयांची एसआयटी चौकशी लावू.”

हेही वाचा : “उद्धव ठाकरेंचा लंडनमध्ये इक्बाल मिर्चीबरोबर डिनर”, नितेश राणेंचा आरोप; आदित्य ठाकरेंवरही टीका

“शिवसेनेच्या खासदारांनी मराठा आरक्षणप्रश्नी राष्ट्रपतींची भेट घेतली आहे. ज्यांना आरक्षण असेल, त्यांना आरक्षण द्यावे. पण, कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता, मराठा समाजाला आरक्षण द्यायला हवे,” अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली आहे.

हेही वाचा : “एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद देण्यासाठी सर्वात मोठा विरोध अजित पवार आणि…”, संजय राऊत यांचं विधान

प्रफुल्ल पटेलांवरून उद्धव ठाकरेंनी भाजपाला घेरलं आहे. “नवाब मलिकांना दूर ठेवण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांना पत्र लिहिलं होतं. तोच न्याय प्रफुल्ल पटेलांबाबत लावणार आहात की नाही?” असा सवाल उद्धव ठाकरेंनी भाजपाला विचारला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uddhav thackeray warn shinde govt over aaditya thackeray sit inquiry ssa