अपक्ष आमदार रवी राणा यांनी काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांच्याबाबत मोठा दावा केला आहे. राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याबरोबर यशोमती ठाकूर भाजपात प्रवेश करणार होत्या. पण, मंत्रीपद न दिल्याने ठाकूर यांनी भाजपात प्रवेश केला नाही, असं वक्तव्य रवी राणा यांनी केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रवी राणा म्हणाले, “विखे-पाटलांनी भाजपात प्रवेश केला, तेव्हा यादी पाहिली होती. त्यात यशोमती ठाकूर यांचंही नाव होतं. मात्र, मंत्रीपद न भेटल्याने ठाकूर यांनी भाजपात प्रवेश केला नाही. ‘कार्यकर्ता म्हणून काम करा, मंत्रीपद भेटणार नाही’ असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं होतं.”

हेही वाचा : VIDEO : “देवेंद्र फडणवीसांनी संभाजी भिडेंना जरांगे-पाटलांकडे पाठवलं असेल, तर…”, जयंत पाटलांचा टोला

“…त्याला मर्द आमदार म्हणतात”

रवी राणा यांनी दर्यापूरचे आमदार बळवंत वानखेडे यांच्यावरही टीका केली आहे. “दर्यापूरचे आमदार ( बळवंत वानखेडे ) तिवसा मतदारसंघातील आमदारांच्या ( यशोमती ठाकूर ) चपला उचलण्याचं काम करतात. जनतेनं आमदार बनवलं आहे, पण चपला कोणाच्या उचलता? नेत्यांच्या खुर्चीला लाथ मारून काम करण्याची ताकद असली पाहिजे. त्याला मर्द आमदार म्हणतात,” असं रवी राणांनी म्हटलं आहे.

हेही वाचा : “मुख्यमंत्री आणि खासदार श्रीकांत शिंदेंकडून भाजपा कार्यकर्त्यांचं खच्चीकरण”, आमदार गणपत गायकवाड यांचा आरोप

“यशोमती ठाकूर यांनी कडक नोटा घेतल्या”

दरम्यान, खासदार नवनीत राणा यांनीही यशोमती ठाकूर यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. “लोकसभा निवडणुकीवेळी माझ्याबरोबर फिरून रवी राणांकडून यशोमती ठाकूर यांनी कडक नोटा घेतल्या. रक्ताचे आश्रू ढाळण्याचं काम ठाकूर यांनी केलं होतं,” असं टीकास्र नवनीत राणांनी सोडलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Yashomati thakur join bjp with radhakrushna wikhe patil but dont ministry his drop joining say ravi rana ssa