काँग्रेसच्या केंद्र व राज्य शासनाच्या एल्गारमध्ये व्यासपीठावर असणारे शहर जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष मुन्ना कुरणे यांनी २४ तास उलटण्यापूर्वीच भाजपात प्रवेश करीत असल्याची घोषणा गुरुवारी पत्रकार बैठकीत केली. खा. संजयकाका पाटील यांच्यासमवेत झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी काँग्रेसमध्ये गटतट निर्माण झाल्याने आपण भाजपात प्रवेश करीत असल्याचे जाहीर केले.
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे उद्या शुक्रवारी सांगली दौऱ्यावर येत असून त्यांच्या उपस्थितीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील काही कार्यकत्रे प्रवेश करणार आहेत. काँग्रेसचे माजी शहर जिल्हाध्यक्ष मुन्ना कुरणे यांच्यासह कवठेमहांकाळ पंचायत समितीचे दोन सदस्यही या वेळी भाजपात सामील होत असल्याचे खा. संजयकाका पाटील यांनी गुरुवारी पत्रकार बठकीत सांगितले.
प्रदेशाध्यक्ष दानवे यांचा एक दिवसाचा भरगच्च कार्यक्रम जिल्हा भाजपाने आयोजित केला असून ते नागज येथे दुष्काळी भागाची पाहणी करणार आहेत. तसेच दुपारी दुष्काळी पाहणीनंतर कवठे महांकाळ येथे भाजपा कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात पक्षप्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला असल्याचे खा. पाटील यांनी सांगितले. या वेळी भाजपाचे आ. सुधीर गाडगीळ, जिल्हाध्यक्ष राजाराम गरुड, शहर जिल्हाध्यक्ष शेखर इनामदार, पश्चिम महाराष्ट्राचे समन्वयक मकरंद देशपांडे आदी उपस्थित होते.
संग्रहित लेख, दिनांक 28th Aug 2015 रोजी प्रकाशित
काल काँग्रेसबरोबर आंदोलन, आज भाजपमध्ये प्रवेश
काँग्रेसच्या केंद्र व राज्य शासनाच्या एल्गारमध्ये व्यासपीठावर असणारे शहर जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष मुन्ना कुरणे यांनी २४ तास उलटण्यापूर्वीच भाजपात प्रवेश करीत असल्याची घोषणा गुरुवारी पत्रकार बैठकीत केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 28-08-2015 at 03:30 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Yesterday movement with the congress today entry in the bjp